४३ वृक्षांवर विनापरवाना कुऱ्हाड चालविल्याची घटना उघडकीस

By admin | Published: February 7, 2015 01:51 AM2015-02-07T01:51:13+5:302015-02-07T01:51:42+5:30

४३ वृक्षांवर विनापरवाना कुऱ्हाड चालविल्याची घटना उघडकीस

Find out the incidents of running unexplained Kurhad on 43 trees | ४३ वृक्षांवर विनापरवाना कुऱ्हाड चालविल्याची घटना उघडकीस

४३ वृक्षांवर विनापरवाना कुऱ्हाड चालविल्याची घटना उघडकीस

Next

पंचवटी : हिरावाडीतील शिवकृपानगरमधील सर्व्हे क्रमांक २०१ / ३ मध्ये असलेल्या शर्मा फार्ममध्ये सुमारे ४३ वृक्षांवर विनापरवाना कुऱ्हाड चालविल्याची घटना उघडकीस आली आहे. महापालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पंचवटी परिसरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याची घटना घडल्याने मनपा प्रशासनही चक्रावून गेले आहे. हिरावाडीतील शिवकृपानगर येथे महेंद्र शर्मा यांचा शर्मा फार्म असून, या फार्मवर शेवगा, आंबा, कडूनिंब, करंज, फिल्टर पाम, जांभूळ, चंदन आदिंसह शेकडो विविध प्रकारची झाडे आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून या फार्ममध्ये विनापरवाना वृक्षतोड सुरूअसल्याची खबर मनपाच्या पंचवटी विभागीय अधिकाऱ्यांना लागली आणि शुक्रवारी सकाळी तातडीने विभागीय अधिकारी अ‍े. पी. वाघ, उद्यान विभागाचे राहुल खांदवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथील आंबा, कडूनिंब, गुलमोहर, चंदन, पाम, जांभूळ अशा विविध जातींची जवळपास ४३ वृक्षांची तोड करून त्यांची लाकडे एका बाजूला ठेवून दिल्याचे आढळून आले. वृक्षतोडीनंतर सदर वृक्ष दिसू नयेत म्हणून तोडलेल्या बुंध्यांवर प्लॉस्टिक पिशव्या ठेवल्याचेही निदर्शनास आले. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या परवानगी शिवाय शहरातील कोणत्याही वृक्षाची तोड करता येत नाही; परंतु याठिकाणी परवानगी न घेताच सर्रास वृक्षतोड होत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाचे अधिकारीही चक्रावून गेले. महापालिकेच्या पथकाने तोडलेल्या झाडांची माहिती घेत त्यांचा पंचनामा केला आहे. सदर वृक्षतोड कुणाच्या सांगण्यावरून झाली अथवा सदर वृक्षतोडीचा ठेका कोणाला देण्यात आला याबाबतची चौकशी महापालिकेच्या प्रशासनाने सुरू केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Find out the incidents of running unexplained Kurhad on 43 trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.