...अखेर शिक्कामोर्तब : रवींद्र सिंगल यांची बदली; विश्वास नांगरे पाटील नाशिकचे पोलीस आयुक्त

By अझहर शेख | Published: February 25, 2019 01:57 PM2019-02-25T13:57:16+5:302019-02-25T14:08:42+5:30

भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदली व पदोन्नती व पदस्थापनेचा आदेश जारी करण्यात आला. लवकरच विश्वास नांगरे पाटील हे सिंगल यांच्याकडून नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्विकारतील.

... finally seal: Ravindra Singhal replaces him; Trust Commissioner of Police, Nangre Patil Nashik | ...अखेर शिक्कामोर्तब : रवींद्र सिंगल यांची बदली; विश्वास नांगरे पाटील नाशिकचे पोलीस आयुक्त

...अखेर शिक्कामोर्तब : रवींद्र सिंगल यांची बदली; विश्वास नांगरे पाटील नाशिकचे पोलीस आयुक्त

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे आव्हानकोल्हापुरमध्ये नांगरे पाटील यांनी गुन्हेगारांच्या सुमारे १०० टोळ्यांवर मोक्का लावला होता

नाशिक : मागील काही दिवसांपासून सोशल मिडियाच्या माध्यमातून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांची बदलीची चर्चा सुरू होती. त्यांच्या रिक्त पदावर कोल्हापुरचे विशेष महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जात होते. सोमवारी (दि.२५) या दोन्ही चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब झाले. गृह विभागाकडून भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदली व पदोन्नती व पदस्थापनेचा आदेश जारी करण्यात आला. लवकरच विश्वास नांगरे पाटील हे सिंगल यांच्याकडून नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्विकारतील.

डॉ रवींद्रकुमार सिंगल यांची औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणुन बदली झाली आहे. त्याचप्रमाणे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नवीन अधीक्षक म्हणून राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपआयुक्त सुनील कडासने यांची नियुक्ती झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक पंजाबराव उगले यांची जळगावचे नवीन पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. तसेच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांची उपमहानिरिक्षक पदी (वस्तु व सेवा कर) विक्रीकर विभागात पदोन्नतीने बदली झाली आहे. जळगावचे माजी पोलीस अधीक्षक दता कराळे हे ठाण्याचे अपर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. दरम्यान, नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकपदी अद्याप कोणाची वर्णी लागली, ते स्पष्ट होऊ शकलेले नाही.

गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे आव्हान
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाºयांच्या बदल्या गृह विभागाकडून करण्यात आल्या आहेत. नाशिक पोलीस आयुक्तालयाचा कारभाराची सुत्रे विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी निश्चितच वाढली आहे. कारण नाशिक शहरात या सव्वा ते दीड महिन्यात खूनाच्या तब्बल सात घटना घडल्या आहेत. यासोबतच घरफोडी, हाणामारी, लूटमार, दुचाकी, चारचाकी चोरींसारखे गुन्हे नित्यनेमाने सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडत आहेत. यामुळे नाशिककरांमध्ये उलटसुलट चर्चाही सुरू आहे. वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान नांगरे-पाटील यांच्यापुढे उभे राहिले आहे. त्यांनी लातूर, अहमदनगर, पुणे, मुंबई, ठाणे या शहरांमध्ये सेवा बजावली आहे. त्यांच्याकडे असलेला अनुभव आणि बेधडक काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची पोलीस दलात ओळख आहे. नाशिकमध्ये त्यांना प्रथमच सेवा बजावण्याची संधी मिळाली असून येथील गुन्हेगारांवर ते कशाप्रकारे खाकीचा वचक निर्माण करतात ते येणा-या काळात दिसून येईल. कोल्हापुरमध्ये नांगरे पाटील यांनी गुन्हेगारांच्या सुमारे १०० टोळ्यांवर मोक्का लावला होता तर पावणे सातशे गुन्हेगारांना गजाआड करण्याची धडाकेबाज कारवाई करुन कोल्हापूरवासीयांना दिलासा दिला होता, अशाच कारवाईची अपेक्षा नाशिककरांना त्यांच्याकडून असणार आहे. गुंडगिरीविरोधात त्यांनी कोल्हापूरमध्ये ‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतीचा अवलंब करत गुंडांना धडा शिकविण्याचे आदेश पोलीस दलाला एका अल्पवयीन मुलीच्या हत्त्येनंतर दिले होते. त्यावेळी त्यांनी राजकीय दबावाला बळी न पडता ‘सर्वांचा दबाव झुगारून कामाला लागा’ असे ठणकावून सांगितले होते. सर्व प्रकारच्या तक्रारींचा सामना करण्यास किंवा संबंधितांना तोंड देण्यास मी सक्षम आहे, असेही नांगरे-पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले होते.
त्यांच्या धडाकेबाज पोलीस सेवा कार्याविषयी संपुर्ण महाराष्टÑाला ओळख आहे. नाशिककरांनाही त्यांच्याकडून कायदासुव्यवस्थेचे असेच चोख संरक्षणाची अपेक्षा आहे. शहर व परिसरात वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणून पोलीस दलाला आलेली मरगळ झटकून टाकण्याचे आव्हान नांगरे-पाटील यांच्यापुढे राहणार आहे.
 

Web Title: ... finally seal: Ravindra Singhal replaces him; Trust Commissioner of Police, Nangre Patil Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.