शेतकऱ्यांचे लक्ष लागले आभाळाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 06:17 PM2019-05-30T18:17:20+5:302019-05-30T18:18:12+5:30

यंदाही पावसाळा लांबल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आाहे. शेतकामाच्या तयारीत असलेल्या शेतकºयाचे लक्ष आभाळाकडे आहे.

Farmers' attention was drawn to the sky | शेतकऱ्यांचे लक्ष लागले आभाळाकडे

शेतकऱ्यांचे लक्ष लागले आभाळाकडे

Next
ठळक मुद्देयंदा पावसाळा उशिरा सुरू होणार असल्याने चिंता

खामखेडा : यंदाही पावसाळा लांबल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आाहे. शेतकामाच्या तयारीत असलेल्या शेतकºयाचे लक्ष आभाळाकडे आहे.
हवामान खात्याने चालू वर्षी लवकर पाऊस येईल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु पावसाळ्याला रोहिणी नक्षत्रापासून सुरवात होते. २४ मेपासून रोहिणी नक्षत्राला सुरवात झाली आहे; परंतु पावसाचे कोणतेही संकेत दिसत नाही.
दरवर्षी १५ मेनंतर पावसाचे वातावरण तयार होत असे. परंतु यावर्षी मे महिना संपत आला तरी पावसाचे कोणतेही चिन्हे दिसत नाही. दिवसभर भरपूर उष्णता होते. परंतु जोरदार वारा वाहत नाही. आकाशात ढग ही जमा होत नाही. त्यामुळे शेतकर्यांचे लक्ष आकाशात लागु आहे.
जर जातात. शेतकरी खरीपाच्या मशागतीच्या कामे पूर्ण करीत आहे. यामुळे खरीपाच्या पेरणी आदि पूर्वमशागत म्हणजे जमिनीला बेले मारणे, वखारणी करणे, शेणखात मिळविणे आदि कामे केल्यास पिकांची पेरणी सुरळीत करता येते. परंतु रोहिणीच्या नक्षत्राने पाठ दाखिवली मृगाचा पावसात भुईमूगाच्या व इतर पिकाच्या दृष्टीने उत्तम असतो.जर मृग नक्षत्रात पावसाला सुरवात झाली तर बाजरी, भुईमुग, तुर, मका आदि पिकांची पेरणी करतात. मका या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते. खामखेडा परिसरामघ्ये मकाच्या पेरणी मोठया प्रमाणात केली जाते. जर मृग नक्षत्रात सुरवातील पाऊस पाडला नाही या पिकांची पेरणीस उशीर होणार आहे. तेव्हा भुईमूग, बाजरी, तुर, मुग, मका आदि पिकाऐवजी , सोयाबीनसह अन्य पिकांची पेरणी करावी लागणार आहे. अजूनही पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने जास्त कालावधिच्या मका क्षेत्रात घट होणार असल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.
गेल्या दोन वर्षापासूनब उशिरा येणाºया पावसामुळे पिकांची नियोजन बदल करावा लागत असल्याने पाहिजे. त्या प्रमाणात पिकाचे उत्पादन येत नाही. त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने हाती उत्पन्न नआल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळत आहे.
लांबलेल्या पावसामुळे शेतकºयांमध्ये आता चिंतेचे वातावरण असून, मागील दोन वर्षापासून दुष्काळाला सामोरे गेल्याने याही वर्षी तीच परिस्थिती उद्भवेल का? याची धास्ती शेतकºयांनी घेतली आहे. गेल्या वर्षीही रोहिणी, मृग नक्षत्रात पावसाने ओढ दिली होती, त्यामुळे पेरणी उशीरा झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती.

Web Title: Farmers' attention was drawn to the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.