येवला तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 01:13 AM2019-01-23T01:13:38+5:302019-01-23T01:14:02+5:30

नाशिक : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात एकाच दिवशी चार शेतकºयांनी केलेल्या आत्महत्येची घटना कायम असताना मंगळवारी येवला तालुक्यातील मुखेड येथे ...

 Farmer suicides in Yeola taluka | येवला तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

येवला तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

Next

नाशिक : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात एकाच दिवशी चार शेतकºयांनी केलेल्या आत्महत्येची घटना कायम असताना मंगळवारी येवला तालुक्यातील मुखेड येथे कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकºयाने डोक्याला बांधावयाच्या फेट्याच्या कापडाने गळफास घेऊन
आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चालू महिन्यात जिल्ह्णातील ही पाचवी शेतकरी आत्महत्याआहे. 
दीपक एकनाथ वझरे (५५) असे या शेतकºयाचे नाव असून, मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. वझरे यांच्या नावे मुखेड येथे १ हेक्टर १५ आर शेतजमीन आहे. त्यांच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी, कर्जबाजारीपणाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी येवला तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, महसूल खात्यानेही आपल्यापरिने चौकशीला सुरुवात केली आहे.

Web Title:  Farmer suicides in Yeola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.