‘डेब्रीज’चा शहराला विळखा ; स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकचे  विद्रुपीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:03 AM2018-12-11T01:03:10+5:302018-12-11T01:03:33+5:30

शहरातील विविध भागांत जुन्या इमारती पाडल्यानंतर निर्माण होणारा सीमेंट, विटांसह घरातील विविध अविघटनशील वस्तू सर्रास रस्त्याच्या बाजूला, मोकळ्या मैदानांवर फे कण्याचा प्रकार सुरू असून, महापालिका प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने एककीडे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकचे दुसरीकडे विद्रुपीकरण होत आहे.

 Explain the city of 'Debris'; Wastropation of Nashik, which is moving towards Smart City | ‘डेब्रीज’चा शहराला विळखा ; स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकचे  विद्रुपीकरण 

‘डेब्रीज’चा शहराला विळखा ; स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकचे  विद्रुपीकरण 

Next

नाशिक : शहरातील विविध भागांत जुन्या इमारती पाडल्यानंतर निर्माण होणारा सीमेंट, विटांसह घरातील विविध अविघटनशील वस्तू सर्रास रस्त्याच्या बाजूला, मोकळ्या मैदानांवर फे कण्याचा प्रकार सुरू असून, महापालिका प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने एककीडे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकचे दुसरीकडे विद्रुपीकरण होत आहे.
नाशिक शहरासह सिडको, अंबड, सातपूर, इंदिरानगर, वडाळा, उपनगर, नशिकरोड परिसरात अनेक वसाहतींमध्ये इमारतींचे नूतनीकरण त्याचप्रमाणे जुन्या इमारती पाडून त्या ठिकाणी नवनवे टोलेजंग टॉवर उभे राहत आहेत. परंतु, जुन्या इमारती पाडल्यानंतर निर्माण होणाºया सीमेंट, विटा, छताचे पत्रे यांसह वेगवेगळ्या प्रकारच्या अविघटनशील वस्तू मोकळ्या मैदानावर फेकल्या जात असल्याचे भीषण वास्तव समोर आले असून, त्यामुळे हरित शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये ठिकठिकाणी डेब्रीज दिसून येत आहे. त्यात गंगापूररोड, कॉलेजरोडसारखे उच्चभ्रू समजले जाणारे परिसरही या समस्येतून सुटले नसून रामवाडी परिसरातील खुल्या मैदानांवर त्याचप्रमाणे रस्त्यांच्या दुतर्फा अशाप्रकारे सीमेंट, विटा, मातीचे ढिगारे दिसून येत आहे.
‘डेब्रीज’मध्ये  असतात हे घटक
डेब्रीजमध्ये घराच्या छताचे पत्रे, तुटलेल्या विटा आणि निकामी सीमेंटसोबतच घरातील स्नानगृह वारण्यात येणाºया विविध साहित्यांसह चुना व विविध रंगांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या लादीच्या तुकड्यांचाही यात समावेश असतो.
या ढिगा-यांमध्ये गंजलेल्या लोखंडाच्या सळई असल्याने भंगार करणारे काही जण त्या जमा करण्यासाठी येथे लोखंड काढताना जखमी होण्याचे प्रकारही घडतात. त्याचप्रमाणे, विटा आणि सीमेंटसोबतच अनेक जण घरातील कीटक मारण्याची औषधे, धारदार वस्तूही फेकत असल्याने भंगार जमा करणाºयांसोबत असलेल्या मुलांनाही गंभीर स्वरुपाची दुखापत अथवा विषबाधा होण्याची शक्यता असल्याने ‘डेब्रीज’चे हे ढिगारे शहराचे विद्रुपीकरण करण्यासोबत जीवघेणेही ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title:  Explain the city of 'Debris'; Wastropation of Nashik, which is moving towards Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.