Existing students gathered for 43 years | तब्बल ४३ वर्षांनी जमले माजी विद्यार्थ्यी
स्नेहमेळाव्यास उपस्थित माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी.

ठळक मुद्देयेवला : स्नेह मेळाव्यात शिक्षकांचा गौरव दिली डिजीटल क्लासरूमची भेट

येवला : येवल्यातील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल अर्थात सध्याचे एन्झोकेम विद्यालयातील एकाच बाकावर बसलेले व पुढील आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले सवंगडी माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने ४३ वर्षांनी पुन्हा एकत्र आले होते. आनंद, आश्चर्य आणि कौतुक अशा संमिश्र भावना सवंगड्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. १९७६ मधील येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व शिक्षकांचा गौरव सोहळा नुकताच संपन्न झाला.
येथील न्यू इंग्लिस स्कूल चे माजी विद्यार्थ्यांच्या स्वागत समितीचे भालचंद्र कुक्कर, कृष्णा चिनगी, राजेंद्र माडीवाले, हेमंत शहा, चंद्रकांत गांगुर्डे, विजय खोकले, प्रीतीबाला पटेल, अरु ण काळे, नारायण रायजादे यांनी पुढाकार घेतला. यावेळी शिक्षक लक्ष्मण वाणी, सुमन वाणी, विजया गुजराथी, बी. के. बाफना, सुरेश पटेल, प्रशांत पटेल, सुरेश भावसार, बी. के. गायकवाड, योगिनी पटेल, ज्योती पटेल, लक्ष्मण आढाव व उषा आढाव आदी ६० विद्यार्थी सपत्नीक उपस्थित होते. दिर्घ कालावधीनंतर सर्व माजी विद्यार्थी पुन्हा एमत्र भेटल्याने सर्वच जण भारावून गेले होते.
यावेळी विद्यालयात उपाध्यक्ष रमेशचंद्र पटेल, सरचिटणीस सुशील गुजराथी, संस्था पदाधिकारी व प्राचार्य दत्तकुमार महाले यांच्यासह अन्य शिक्षकांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्र माची सुरु वात सरस्वती, तात्या टोपे व क्र ांतीज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमापूजनाने झाली. विद्यार्थी मेळाव्याची भुमिका माधुरी देशमुख यांनी विषद केली. शाळेमध्ये स्वागत गीत व सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्था पदाधिकारी, प्राचार्य, माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर शिक्षकांच्या वतीने माजी प्राचार्य विजया गुजराथी, विद्यार्थ्यांच्या वतीने भालचंद्र कुक्कर, रविंद्र पेंढारकर यांनी मनागत व्यक्त केले.
या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयात उभारलेल्या अद्यावत डिजीटल क्लासरूमचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष पंकज पारख व यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन दत्ता उटवाळे, सुरेश कोल्हे, राजेंद्र गायकवाड यांनी केले तर संजय बिरारी यांनी आभार मानले.
मिटिंग हॉल मध्ये सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी जीवनातील वेगवेगळे अनुभव कथन केले. त्यामध्ये जीवनातील चढउतार याविषयी मोकळ्या गप्पा मारल्या.
कार्यक्र मास अशोक शहा, विजय पारख, संजय मारशा, रवींद्र पेंढारकर, प्रवीण बाकळे, पांडुरंग वखारे, प्रकाश देवगावकर, चंद्रकांत पटेल, निलांबरी घोडके, सुमन चौटे, राजमती कुंभकर्ण, सुमन कट्यारे, शारदा देवरे, पुष्पा मुथा, ज्योती गोलांडे, अलका काळे, चित्रा शिंदे, शोभा दातरंगे, निर्मला पवार, उषा शहा, उषा लुटे, सुभाष बारवकर, रत्नाकर सोनवणे, किशोर खानापुरे, विजय गायकवाड, रामदास शिंदे, सुदाम कोटमे, रामदास कोटमे, कमलाकर चव्हाण आनंदा भवर, आरखडे, क्षीरसागर, डोंगरे, जेजुरकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

 

 


Web Title: Existing students gathered for 43 years
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.