‘युरोपा’वर पृथ्वीच्या अडीचपट पाणी बर्फस्वरूपात अस्तित्वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:41 AM2018-11-22T00:41:16+5:302018-11-22T00:41:31+5:30

जगभरात सध्या पृथ्वी व्यतिरिक्त अन्य कोणत्या ग्रहावर पाणी अथवा जीवसृष्टी आहे, याविषयी संशोधन सुरू असून, गुरूचा उपग्रह असलेल्या युरोपावर गोठलेले पाणी असून, ते पृथ्वीच्या अडीचपट असल्याचे समोर आले आहे.

 At Europe, about 250 hectares of earth's water exists in ice form | ‘युरोपा’वर पृथ्वीच्या अडीचपट पाणी बर्फस्वरूपात अस्तित्वात

‘युरोपा’वर पृथ्वीच्या अडीचपट पाणी बर्फस्वरूपात अस्तित्वात

Next

नाशिक : जगभरात सध्या पृथ्वी व्यतिरिक्त अन्य कोणत्या ग्रहावर पाणी अथवा जीवसृष्टी आहे, याविषयी संशोधन सुरू असून, गुरूचा उपग्रह असलेल्या युरोपावर गोठलेले पाणी असून, ते पृथ्वीच्या अडीचपट असल्याचे समोर आले आहे. आता या बर्फस्वरूपातील पाण्यासोबतच युरोपावर जीवसृष्टीसाठी पोषक असे आणखी काही घटक शोधण्यासाठी नासाचे संशोधन सुरू असल्याची माहिती नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरटीरेचे मायक्रेवेव्ह इंजिनिअर डॉ. रोहित गावंदे यांनी दिली.
सार्वजनिक वाचनालय, नाशिक पुस्तक मित्रमंडळ व स्वर्गीय कल्पना चावला फाउंडेशनतर्फे नासाच्या माध्यमातून अवकाश संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या डॉ. रोहित गवांदे आणि डॉ. चैताली पाराशरे दाम्पत्याने नाशिक ते नासा प्रवास आणि अवकाश मोहिमेत युवकांना संधी विषयावर व्याख्यान दिले. व्यासपीठावर स्वर्गीय कल्पना चावला फाउंडेशनच्या प्रमुख अपूर्वा जाखडी, प्रा. विलास औरंगाबादकर, जयदीप शाह आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. रोहित गावंदे आणि डॉ. चैताली पाराशरे यांनी अंतराळाचे अंतरंग व त्यासंबंधीच्या संशोधनाच्या विविध बाजू नाशिककरांसमोर उलगडतांना नाशिकमध्ये शिक्षण घेऊन सांगितले.
यावेळी डॉ. रोहित गावंदे आणि चैताली पाराशरे यांनी विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान क्षेत्रात तसेच खगोल शास्त्रामध्ये असलेल्या विविध संधींबाबत माहिती दिली.
दरम्यान, उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत डॉ. रोहित गवांदे आणि डॉ. चैताली पाराशरे यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या शंकाचे निरसनही केले. प्रास्ताविक सावानाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष सबनीस यांनी केले, तर प्रा. रमेश कडलग यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात संधी
नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीत (जेपीएल) राहविल्या जाणाºया विविध प्रकारच्या मोहिमांची माहिती देताना रोहित गावंदे व चैताली पराशरे यांनी या क्षेत्रात विद्यार्थ्यांना अनेक संधी असल्याचे सांगितले. अंतराळ संशोधन क्षेत्रात एअरोस्पेस इंजिनिअरिंगसोबत विविध शाखांतील विद्यार्थ्यांना संधी असून, अर्थ सेन्सिंग, क्यूब सॅटेलाइट, ध्वनी लही, प्रकाशलहरी, विद्युतलहरी आणि वेगवेगळ्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण लहरींसोबत तपमान व वातावरणातील अन्य घटकांचा अभ्यास करण्यासाठी व त्यावर आधारित उपकरणे विकसित करण्यासठी यासंबंधी संशोधन करणाºया विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात संधी आहे. त्यासोबतच युरोपा क्लिपर या गुरूच्या उपग्रहावर जाणाºया मोहिमेचीही त्यांनी उपस्थिताना माहिती दिली.

Web Title:  At Europe, about 250 hectares of earth's water exists in ice form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.