अस्मिता योजनेद्वारे बचतगट करणार सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:06 AM2018-04-13T00:06:50+5:302018-04-13T00:06:50+5:30

नाशिक : महिलांना आत्मसन्मान आणि स्वाभिमान मिळवून देणाऱ्या अस्मिता या योजनेची ही केवळ सुरुवात आहे. आगामी काळात महिलांच्या गरजा लक्षात घेऊन या योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, यासाठी महिला बचतगटांना अधिक सक्षम केले जाईल, असे प्रतिपादन ग्रामविकास आणि महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

Enable self help groups through asmita scheme | अस्मिता योजनेद्वारे बचतगट करणार सक्षम

अस्मिता योजनेद्वारे बचतगट करणार सक्षम

Next
ठळक मुद्देपंकजा मुंडे : पहिल्या महिला मेळाव्याप्रसंगी प्रतिपादन मुंडे यांच्या हस्ते आॅनलाइन अस्मिता योजना नोंदणीचे उद्घाटन

नाशिक : महिलांना आत्मसन्मान आणि स्वाभिमान मिळवून देणाऱ्या अस्मिता या योजनेची ही केवळ सुरुवात आहे. आगामी काळात महिलांच्या गरजा लक्षात घेऊन या योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, यासाठी महिला बचतगटांना अधिक सक्षम केले जाईल, असे प्रतिपादन ग्रामविकास आणि महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणाºया ‘अस्मिता’ योजनेच्या शुभारंभप्रसंगी इदगाह मैदानावर आयोजित महिला मेळाव्याप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, सभापती सुनीता चारोस्कर, अर्पणा खोसकर, मनीषा पवार, यतिंद्र पाटील, हिरामण खोसकर, महिला बालकल्याण विभागाचे सचिव असीम गुप्ता, प्रकल्प संचालक प्रमोद पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उदय सांगळे, विक्रांत चांदवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुंडे म्हणाल्या, महिलांना सन्मानाने जगण्यासाठीची अस्मिता योजना असून, तिची सामाजिक प्रतिष्ठा, शिक्षण आणि आरोग्य हा तिचा हक्क आहे. महिलांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठविला पाहिजे. हाच उद्देश समोर ठेवून अस्मिता योजना तयार करण्यात आली आहे. सॅनिटरी नॅपकिन हा या योजनेचा एक भाग आहे. महिलांचे आरोग्य आणि सामाजिक हक्क अबाधित ठेवण्यासाठी महिलांच्या संदर्भातील अनेक उपक्रम हाती घेण्यात येणार असून, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम केले जाणार आहे. महिला बचत गट या महिलांना लागणाºया गरजेच्या वस्तुंच्या वितरक म्हणून काम करतील, अशी योजना आहे. त्यामुळे महिला बचतगटांना सक्षम करून गाव खेड्यातील महिलांपर्यंत पोहचण्यासाठी बचत गट मोठे माध्यमत असल्याचे त्या म्हणाल्या. ज्या बचतगटांनी शंभर टक्के कर्जपरतफेड केलेल आहे अशा बचत गटांना शून्य टक्के व्याज तत्त्वावर कर्ज देऊन या बचतगटांना सक्षम केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, महिला बालकल्याण विभागाचे सचिव असीम गुप्ता यांची भाषणे झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन कल्पना साठे यांनी केले. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. नरेश गिते यांनी केले. प्रारंभी मुंडे यांच्या हस्ते आॅनलाइन अस्मिता योजना नोंदणीचे उद्घाटन करण्यात आले. 1शहरी भागातही होणार विस्तार
ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही अस्मिता योजनेचा विस्तार केला जाईल, असे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. या संदर्भात आपण यापूर्वीच नगरविकास खात्याशी चर्चा केल्याचे सांगितले. सॅनिटरी नॅपकीनची किंमत पाच रुपये असली तरी ही किंमत शून्यापर्यंत आणण्याचा मानस असल्याचे मुंडे यांनी सांगितले. मुक्ता बेंडकुळेने वेधले लक्षअस्मिता योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी त्र्यंबकेश्वरजवळील कस्तुरबा गांधी विद्यामंदिर शाळेची इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी मुक्ता बेंडकुळे हिने हजारो महिलांपुढे सॅनटरी नॅपकिनविषयी केलेल्या भाषणाने सर्वांनाच खिळवून ठेवले. मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह व्यासपीठावर साºयाच अवाक होऊन मुक्ताचे भाषण ऐकत होते. भाषण संपल्यानंतर स्वत: मुंडे यांनी तिचे फूल देऊन कौतुक करीत आस्थेने विचारपूस केली. मुंडे यांनी आपल्या भाषणात अनेकदा मुक्ताच्या नावाचा उल्लेख केला.

सुमतीबाई सुकळीकर योजना
महिला बचतगटांना सुमतीबाई सुकळीकर योजनेच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजावर कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. बचतगटाच्या माध्यमातून अशिक्षित महिलादेखील सक्षम आणि संघटित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रत्येक नागरिक
स्वच्छतादूत व्हावा...
राज्यातील केवळ १७ टक्के महिलाच सॅनिटरी नॅपकीन वापरत असून, हे चित्र अतिशय भयावह आहे.
सॅनिटरी नॅपकिनमुळे महिलांच्या आरोग्याचे रक्षण होणार असल्याने प्रत्येकाने स्वच्छता दूत म्हणून गावागावात हा आरोग्याचा संदेश पोहचविण्याचे आवाहन मुंडे यांनी यावेळी केले.

Web Title: Enable self help groups through asmita scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक