इगतपुरी आगारात वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 11:46 PM2018-06-09T23:46:51+5:302018-06-09T23:46:51+5:30

घोटी : राज्यभरात एसटी कर्मचाºयांनी वेतनवाढीसाठी पुकारलेल्या अघोषित संपाला इगतपुरीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. संपाच्या दुसºया दिवशी तालुक्यातील सर्व जवळपास अडीचशे कर्मचाºयांच्या वेगवेगळ्या संघटनांनी भाग घेत निषेध नोंदवला आहे.

Employees' racket closure for the wage increase in Igatpuri Depot | इगतपुरी आगारात वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांचा कडकडीत बंद

इगतपुरी आगारात वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांचा कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देवेगवेगळ्या संघटनांनी भाग घेत निषेध नोंदवला

घोटी : राज्यभरात एसटी कर्मचाºयांनी वेतनवाढीसाठी पुकारलेल्या अघोषित संपाला इगतपुरीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. संपाच्या दुसºया दिवशी तालुक्यातील सर्व जवळपास अडीचशे कर्मचाºयांच्या वेगवेगळ्या संघटनांनी भाग घेत निषेध नोंदवला आहे.
राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकचे अध्यक्ष भास्कर गुंजाळ यांनी इगतपुरी आगारात भेट देऊन अघोषित संपाला पाठिंबा जाहीर केला.
राज्यात असलेल्या एक लाख दोन हजार कर्मचाºयांना तातडीने सातवा वेतन आयोग लागू करावा, १ जुलै २०१६ पासून वाढीव सात टक्के महागाई भत्ता द्यावा, जानेवारी २०१७ पासून वाढीव चार टक्के महागाई भत्त्याची थकबाकी तत्काळ द्यावी इत्यादी मागण्यांवर सर्व संघटना ठाम असून, यावर तोडगा काढण्यासाठी सर्व संघटनांचे पदाधिकारी मुख्यमंत्री व परिवहनमंत्री यांच्यासोबत बैठकीतून तोडगा काढणार असल्याचे समजते.तालुक्यात या संपामुळे पन्नासच्या वर एसटी बसेस बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण विस्कळीत झाले असून, ऐन शाळा भरण्याच्या मोसमात हा संप चालू झाल्याने विद्यार्थ्यांचे तसेच वृद्धांचे अतोनात हाल होत आहेत. या संपाबाबत लवकर तोडगा न निघाल्यास राज्यात एसटी महामंडळाला याचा मोठा फटका बसणार आहे. त्यात हा संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील एकशेएकवीस कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र हा संप लवकर मिटावा याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Employees' racket closure for the wage increase in Igatpuri Depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.