पुण्यस्मरणाचा खर्च टाळून आदिवासी बालकांना शैक्षणिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 02:34 PM2018-09-19T14:34:46+5:302018-09-19T14:34:59+5:30

पेठ -घरातील एकूलता एक मुलगा गमावण्याचे आभाळभर दु:ख ऊराशी बाळगून त्याच्या आठवणी चिरकाल स्मरणात रहाव्यात यासाठी पेठच्या जाधव कुंटूबियांनी मुलाच्या प्रत्येक पुण्यस्मरण दिनाला कोणताही धार्मिक विधी न करता आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा घेतलेला निर्णय आदर्शवत ठरला आहे.

Educational assistance for tribal children avoiding the cost of sacrifice | पुण्यस्मरणाचा खर्च टाळून आदिवासी बालकांना शैक्षणिक मदत

पुण्यस्मरणाचा खर्च टाळून आदिवासी बालकांना शैक्षणिक मदत

Next

पेठ -घरातील एकूलता एक मुलगा गमावण्याचे आभाळभर दु:ख ऊराशी बाळगून त्याच्या आठवणी चिरकाल स्मरणात रहाव्यात यासाठी पेठच्या जाधव कुंटूबियांनी मुलाच्या प्रत्येक पुण्यस्मरण दिनाला कोणताही धार्मिक विधी न करता आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा घेतलेला निर्णय आदर्शवत ठरला आहे.
कै. योगेश वसंत जाधव या प्राथमिक शिक्षकाचे सहा वर्षापूर्वी अपघाती निधन झाले. नुकतीच कुठे नोकरी व संसार या दोघांची आनंदी सुरु वात होऊ पाहत असतांना काळाने घात केला .स्वप्नातील संसाराचा डाव सुरू होण्यापुर्वीच मोडला. घरातील एकुलता एक उच्चशिक्षति मुलगा, पती, भाऊ गमावल्पाचे दु:ख जाधव कुटूंबियाला न पेलवण्याएवढे होते. योगेश हे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून पेठ तालुक्यात परिचित होते. म्हणून त्यांच्या दरवर्षीच्या पुण्यस्मरण दिवसाचे औचित्य साधून जाधव परिवाराकडून सामाजिक उपक्र म राबवण्याची प्रथा सुरू केली आहे. योगेशचे संपुर्ण नातेवाईक शिक्षण क्षेत्रात असल्याने बिहण मंदा जाधव-सगणे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आदिवासी मुलांना दप्तर, वहया, पाटया, पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत असते.
या वर्षी अतिदुर्गम अशा कहांडोळपाडा येथील प्राथमिक शाळेतील चिमूकल्यांना साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी केंद्रप्रमूख जनार्दन जाधव, राजेंद्र भोये, गोवर्धन खंबाईत, रमेश वाघ, प्रविण गायकवाड, अनिल सांगळे, मंदा जाधव, धनराज सगणे, संजय भोये, मधुकर जाधव यांचे सह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Educational assistance for tribal children avoiding the cost of sacrifice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक