शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक हरपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:49 PM2018-08-12T22:49:15+5:302018-08-13T00:32:10+5:30

मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक नारायणराव पवार यांच्या निधनाने या क्षेत्रातील त्यागी व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.

Education sector guides no longer | शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक हरपले

शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक हरपले

googlenewsNext
ठळक मुद्देमान्यवरांची शोकभावना : नारायणराव पवार यांना श्रद्धांजली

नाशिक : मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक नारायणराव पवार यांच्या निधनाने या क्षेत्रातील त्यागी व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
नारायणराव पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव म्हणाल्या की, पवार यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडविले. शिक्षण क्षेत्रात त्यांचे कार्य सर्वांना प्रेरणा देत राहील. मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सांगितले की, नारायणराव पवार यांनी मविप्र संस्थेचा नावलौकिक वाढविण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांचे कार्य विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि अन्य मुख्याध्यापकांसाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे. आमदार डॉ. सुधीर तांबे आपल्या शोकभावना व्यक्त करताना म्हणाले की, पवार यांचे जीवन त्यागी, निरपेक्ष आणि मंगलमय होते. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. याप्रसंगी कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव, ग्रामोदय शिक्षण संस्थेचे मुन्ना हिरे, मविप्रचे माजी शिक्षणाधिकारी आर. एस. अहेर, प्रा. डॉ. यशवंत पाटील, शिरीष सावंत, गौतम सुराणा, यतिंद्र घुगे, भगीरथ शिंदे आदींसह मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माणिकराव कोकाटे, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी उपमहापौर अजय बोरस्ते, रवींद्र पगार, अमृता पवार, अ‍ॅड. नितीन ठाकरे आदींसह राजकीय व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Education sector guides no longer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.