इगतपुरी तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 05:24 PM2018-12-17T17:24:28+5:302018-12-17T17:26:17+5:30

वाडीवºहे : सर्वाधिक पाऊस होत असलेल्या इगतपुरी तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरण्याची चिन्हे असून डिसेंबर महिन्याच्या मध्यावरच तालुक्यातील धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदापाऊसही कमी पडल्याने धरणांमध्ये सुध्दा अतिशय कमी जलसाठा शिल्लक असल्याने यावर्षी लवकरच पाणी टंचाई जाणवेल अशी चिन्हे दिसू लागली आहे.

Due famine in Igatpuri taluka is dark | इगतपुरी तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद

इगतपुरी तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद

Next
ठळक मुद्दे तालुक्याबरोबरच मराठवाडा नगर मुंबईकरांना देखील तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लगणार

वाडीवºहे : सर्वाधिक पाऊस होत असलेल्या इगतपुरी तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरण्याची चिन्हे असून डिसेंबर महिन्याच्या मध्यावरच तालुक्यातील धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदापाऊसही कमी पडल्याने धरणांमध्ये सुध्दा अतिशय कमी जलसाठा शिल्लक असल्याने यावर्षी लवकरच पाणी टंचाई जाणवेल अशी चिन्हे दिसू लागली आहे.
इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर म्हणून ओळखला जातो, जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यमान या तालुक्यात नोंदविले जाते. या पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा स्त्रोत अडवून या तालुक्यात सात मोठी धरणे बांधली आहेत, ज्याद्वारे मुंबई, मराठवाडा, नगर,अशा अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पुरवठा केला जातो.
मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्याने शासनाने अगोदरच या तालुक्यास दुष्काळ ग्रस्त तालुका यादीत समाविष्ट केले आहे. त्यात धरणे क्षमतेपेक्षा कमी भरल्याने आणि पाटबंधारे विभागाने भरमसाठ पाणी जायकवाडी आणि वैजापूर एक्सप्रेस कालव्यासाठी सोडल्याने डिसेंबर महिन्याच्या मध्यावरच धरणांमध्ये खडखडाट झाला आहे. त्यामुळे तालुक्याबरोबरच मराठवाडा नगर मुंबईकरांना देखील तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लगणार आहे.
तालुक्यात मुकणे, दारणा, वाकी खापरी, भाम, भावली, कडवा, वैतरणा अशी सात मोठी धरणे आहेत. वैतरणा धरणाचे पाणी मुंबईसाठी व जलविद्युत प्रकल्पसाठी वापरले जाते तर इतर धरणांचे पाणी मराठवाडा व इतर ठिकाणी जाते. तर छोट्या लघुबंधारे, पाझर तलाव यांचे पाणी परिसरातील गावासाठी वापरले जाते. अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना, जलसिंचन योजना या धरणांवर अवलंबून आहेत.
पाऊस कमी झाल्याने जामिनीतील पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर घटली असून अनेक विहिरिंनी तळ गाठले आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. दुष्काळामुळे शेतकाºयांनी रब्बी हंगामाकडे पाठ फिरविली आहे. आणि खरीपाबरोबरच रब्बी हंगाम ही धोक्यात आला आहे. पिकांना भाव नाही, कर्ज उपलब्ध होत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे.
त्यात जलसाठे आटू लागल्याने जनावरांच्या पाण्याचा आणि चाºयाचा प्रश्नही गंभीर बनणार आहे. त्यामुळे शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी दुष्काळ निवारणासाठी आतापासुन नियोजन करणे गरजेचे आहे. आढावा बैठक घेवून यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. पाण्याची आवर्तने देतांना काटेकोर नियोजन महत्वाचे असल्याचे शेतकरी बोलत आहेत.
मुकणे व दारणा धरणातून गेल्या महीन्याभर पाणी सुरु होते. मात्र यावर कुणीही आवाज उठवला नाही. प्रसिद्धि माध्यमातून यावर आवाज उठवल्यानंतर पाणी बंद करण्यात आले होते. ही आवर्तने दिल्याने मुकणे व दारणा ही धरणे लवकरच तळ गाठतील असे चित्र आहे. यावर अवलबुन असलेले शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.
-------------------------------------------------------------
धरण              १६ डिसेंबर २०१७ चा साठा      १६ डिसेंबर २०१८ चा साठा
                                                                        
दारणा                  ९२.९६ %                               २९.३३ %
मुकणे                 ८२.२९ %                                ४१.४७ %
कडवा                  ८३.३५ %                               ५०.७३ %
भावली                ९८.०७ %                                ३५.१० %
वाकी खापरी        ७५.६३ %                               ५८.२४ %
-------------------------------------------------------------
 

Web Title: Due famine in Igatpuri taluka is dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.