दरी रस्त्यावरील पूल कोसळण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:21 AM2018-11-28T00:21:47+5:302018-11-28T00:22:13+5:30

नाशिक तालुक्यातील दरी, धागूर, आळंदी डॅममार्गे पुढे अनेक गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल कमकुवत झाल्याने मध्यम वजनाच्या वाहनांनीच तो हलू लागला असून, सदर पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याची त्वरित देखभाल दुरुस्ती करावी अन्यथा मोठ्या दुर्घटनेला सामोेरे जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Due to the collapse of the bridge on the valley road | दरी रस्त्यावरील पूल कोसळण्याची भीती

दरी रस्त्यावरील पूल कोसळण्याची भीती

Next

मातोरी : नाशिक तालुक्यातील दरी, धागूर, आळंदी डॅममार्गे पुढे अनेक गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल कमकुवत झाल्याने मध्यम वजनाच्या वाहनांनीच तो हलू लागला असून, सदर पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याची त्वरित देखभाल दुरुस्ती करावी अन्यथा मोठ्या दुर्घटनेला सामोेरे जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या संदर्भात वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने स्थानिक शेतकºयांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आळंदी डॅमकडे तसेच दरी व अनेक लहान, मोठ्या गावांना जोडणाºया मुख्य रस्त्यावरील पुलाची अवस्था ही अत्यंत बिकट झाली असून, वाहनधारकांना त्यावरून वाहने नेताना भीती वाटू लागली आहे. याबद्दल स्थानिक नागरिकांनी अनेकदा पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांकडे तक्रारी केल्या, परंतु त्यांनी पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगून त्यांच्याकडे तक्रार करा, असा सल्ला देऊन हात वर केले आहेत. तर बांधकाम खात्याकडे तक्रार केली असता त्यांनी पाटबंधारे खात्याकडे बोट दाखविले आहे. या दोन्ही खात्यांच्या टोलवाटोलवीमुळे या रस्त्याची व त्यावरील पुलाची मालकी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिसरातील गावांना जोडणाºया या रस्त्याची अवस्था बिकट झाली असून, पुलावरून वाहन गेल्यास त्याचा स्लॅब पडू लागला आहे.
मोठ्या वाहनामुळे तर पुलाला मोठ्या प्रमाणात हादरे बसून पूल कोसळतो की काय असे वाटू  लागते.  त्यामुळे हा पूल कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सदर पुलाचे आॅडिट करून त्याचे बळकटीकरण करावे किंवा सदरचा पूल जमीनदोस्त करून नवीन पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी केली जात असून, तसे न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.
आळंदी डॅमकडे तसेच दरी व अनेक लहान, मोठ्या गावांना जोडणाºया मुख्य रस्त्यावरील पुलाची अवस्था ही अत्यंत बिकट झाली असून, वाहनधारकांना त्यावरून वाहने नेताना भीती वाटू लागली आहे.

Web Title: Due to the collapse of the bridge on the valley road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.