कुत्र्याच्या हल्ल्यात हरणाचे पाडस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 03:49 PM2019-06-03T15:49:11+5:302019-06-03T15:50:00+5:30

नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल रेल्वे स्टेशन लगत पाण्याच्या शोधात हरणाचा कळप येताना गावातील व स्टेशन परिसरातील आठ ते दहा कुत्र्यांनी पाडसावर हल्ला केला.

In the dog attack, the fodder is damaged | कुत्र्याच्या हल्ल्यात हरणाचे पाडस जखमी

कुत्र्याच्या हल्ल्यात हरणाचे पाडस जखमी

Next
ठळक मुद्देपाण्यावाचून तहानलेल्या दोन महीन्याच्या पाडसाला कुत्र्यांनी पाठलाग केला असता पाडसाने जीव वाचिवण्यासाठी पळत सुटले ते माजी सरंपच प्रमोद पाटील यांच्या वस्तीच्या दिशेने धाव घेतली.




नगरसुल :
येवला तालुक्यातील नगरसुल रेल्वे स्टेशन लगत पाण्याच्या शोधात हरणाचा कळप येताना गावातील व स्टेशन परिसरातील आठ ते दहा कुत्र्यांनी पाडसावर हल्ला केला. तितक्यात सरपंच पाटील यांनी घरा समोरु न जानकी लॉन्सच्या दिशेने कुत्रे पळत असल्याचे पाहीले. त्यात हरणाचे पाडस दिसल्यावर दत्तु भाबड, गणेश गादीकर, काशिनाथ सोनवणे यांची मदत घेऊन पाटील यांनी त्या पाडसाचे प्राण वाचिवले. हे पाडस कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाले.त्याच्या पायाला व पोटाला जखमा होवून रक्तबंबाळ झाले होते. त्यामुळे पाडस घाबरले होते. कुत्रे पाठलाग करीत असतांना मानवाचा सहारा मिळताच हे पाडस पळत आले.
हे हरणाचे पाडस कुत्र्याच्या तोंडातुन सोडविले . हरणाच्या पाडसाला आपल्या हातून जीवदान मिळाल्याचे समाधान झाले.
त्याला घरी आणुन पाणी पाजले व शांत झाल्यावर घास दिला. येवला व राजापुर वनविभागातीत अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहीती सरपंच पाटील यांनी दिली. काही वेळातच वन कर्मचारी विलास बागुल यांच्या स्वाधीन केले. येवला येथे औषध उपचार करु न दोन दिवस ठेवून पुन्हा कुसमाडीच्या जंगलात सोडणार असल्याचे सांगितले.
 

Web Title: In the dog attack, the fodder is damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.