अडथळा हटवला; सिग्नल ‘लाल’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:35 AM2018-07-03T00:35:49+5:302018-07-03T00:36:04+5:30

राजीव गांधी भवनजवळील शांतारामबापू वावरे चौकामधील सिग्नलवरून नव्या पंडित कॉलनीत जाणारा रस्ता केवळ एकेरी वाहतुकीसाठी असल्याचे वाहतूक पोलिसांनी अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे; मात्र या सिग्नलवरील बॅरिकेड्स सोमवारी (दि.२) हटविल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असे सर्वांनाच वाटले, मात्र केटीएचएमकडून येणाऱ्या वाहनांना दिवसभर ‘ग्रीन’ सिग्नल मिळालाच नाही त्यामुळे भंबेरी उडाल्याचे चित्र होते.

 Disrupted; Signal 'red' | अडथळा हटवला; सिग्नल ‘लाल’च

अडथळा हटवला; सिग्नल ‘लाल’च

Next

नाशिक : राजीव गांधी भवनजवळील शांतारामबापू वावरे चौकामधील सिग्नलवरून नव्या पंडित कॉलनीत जाणारा रस्ता केवळ एकेरी वाहतुकीसाठी असल्याचे वाहतूक पोलिसांनी अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे; मात्र या सिग्नलवरील बॅरिकेड्स सोमवारी (दि.२) हटविल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असे सर्वांनाच वाटले, मात्र केटीएचएमकडून येणाऱ्या वाहनांना दिवसभर ‘ग्रीन’ सिग्नल मिळालाच नाही त्यामुळे भंबेरी उडाल्याचे चित्र होते.
केटीएचएम महाविद्यालया-जवळील लहान उड्डाणपुलापासून तरणतलावाकडे जाण्यासाठी नव्या पंडित कॉलनीमधील रस्ता मागील दोन महिन्यांपासून एकेरी करण्यात आला आहे. रस्ता अरुंद असल्याचे कारण देत शहर वाहतूक नियंत्रण शाखेने या रस्त्यावरील दुहेरी वाहतूक थांबविली. लोकांना हा नवा बदल लक्षात यावा, या उद्देशाने सिग्नलवर बॅरिकेड्स टाकून ‘त्या’ बाजूने येणाºया वाहनांची वाट अडविली गेली होती. या बाजूच्या वाहनाचालकांना असलेल्या सिग्नलवर डावे-उजवे व सरळ दिशेने जाणाºया मार्गावर बंदी असल्याची सांकेतिक चिन्ह स्पष्टपणे दिसतात आणि सिग्नलही लाल आहे, त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियम लक्षात घेऊन अज्ञान दूर करत या मार्गाचा दुहेरी वापर थांबवावा, असे शहर वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र बॅरिकेड्स हटविल्यामुळे सोमवारी या सिग्नलवर काही वेगळेच चित्र पहावयास मिळाले. पोलिसांनी बॅरिकेड उचलून नेले आणि नागरिकांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असा त्याचा सोईस्कर अर्थ लावला. यामुळे सिग्नलवर वाहतूक कोंडी दिवसभर होत होती.
कारण उड्डाणपुलाकडून आलेली वाहने सिग्नल पुढे लाल असल्याने बॅरिकेड नसल्याने थांबून राहत होती आणि काही करेना सिग्नल हिरवा होत नसल्याने पुढील वाहनचालक वाहने पुढे नेत नव्हते. यामुळे एकापाठोपाठ वाहने उभी राहिल्याने पंडित कॉलनीत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सुदैवाने अपघाताचा धोका टळला
वाहनचालक डावीकडे वळण घेत सीबीएसकडे व काही उजवीकडे वळण घेत कॅनडा कॉर्नरकडे जाताना दिसून आले. या दोन्ही बाजूने जाणाºया वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन तर केलेच; मात्र वाहतूक कोंडीलाही निमंत्रण दिले. कारण त्यांचा सिग्नल हिरवा होत नाही तरीदेखील वाहनचालक पादचाºयांसाठी सिग्नलमध्ये सेट केलेल्या वेळेत चोरून आपली वाट मोकळी करून घेत होते. सुदैवाने दिवसभरात कुठलाही अपघात या चौकात घडला नाही, अन्यथा बॅरिकेड्स हटविल्याचा अनर्थ झाला असता, अशी चर्चा सुरू होती.
‘अरे, आपला सिग्नल हिरवा कधी होईल’
सीबीएस व कॅनडा कॉर्नरकडून येणाºया वाहनचालकांचा सिग्नल वेळोवेळी ‘ग्रीन’ होत होता आणि तरणतलाव सिग्नलकडून येणाºया वाहनांनाही नव्या पंडित कॉलनीकडे जाण्यासाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळत होता; मात्र केटीएचएमकडून आलेले वाहनचालक बॅरिकेड्स हटविल्यामुळे सिग्नलवर वाहने घेऊन उभी होती, कारण पुढे सिग्नल ‘लाल’ होता. यावेळी अनेकांच्या मुखातून ‘अरे, आपला सिग्नल हिरवा होतो की नाही...’ असे शब्द कानी पडले.

 

Web Title:  Disrupted; Signal 'red'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.