‘समृद्धी’साठी जमीनमालकांशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:55 AM2018-04-03T01:55:14+5:302018-04-03T01:55:14+5:30

जिल्ह्णातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी अजून ४० टक्के जमीन संपादन करणे बाकी असल्याने त्यासाठी जागा न देणाºया जमीनमालकांशी थेट संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी दिली.

 Direct communication with the landlords for 'prosperity' | ‘समृद्धी’साठी जमीनमालकांशी थेट संवाद

‘समृद्धी’साठी जमीनमालकांशी थेट संवाद

Next

नाशिक : जिल्ह्णातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी अजून ४० टक्के जमीन संपादन करणे बाकी असल्याने त्यासाठी जागा न देणाºया जमीनमालकांशी थेट संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी दिली. शासनाने समृद्धी महामार्गाचे काम चालू महिन्यात सुरू करण्याची तयारी चालविली असली तरी, नाशिक जिल्ह्णातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतून फक्त ५७ टक्केच जमिनीची खरेदी झाली आहे. ज्या वेगाने प्रारंभी जमिनींची खरेदी करण्यात आली त्याला गेल्या दोन महिन्यांपासून ब्रेक लागला असून, जमीनमालकांना अजूनही शासनाकडून आशा आहे. शिवडे ग्रामस्थांनी, तर जमिनीची मोजणी करण्यास असलेला विरोध अद्याप कायम ठेवला आहे. अशा परिस्थितीत लवकरात लवकर समृद्धीसाठी जमीन खरेदीसाठी जिल्हाधिकारी थेट जमीनमालक शेतकºयांशी बोलणी करून त्यांना राजी करणार आहे. मात्र असे करताना शिवड्याच्या जमीन मालकांशी कोणतीही चर्चा केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवडे ग्रामस्थांशी थेट सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनीच संवाद साधल्यामुळे आता त्यांच्याकडून जमीन मोजणीची अनुमतीची प्रतीक्षा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वॉटर कप’ स्पर्धेसाठी सिन्नर व चांदवड तालुक्यातील अधिकाधिक गावांचा समावेश करण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेसाठी धरणातून गाळ काढण्या साठी लागणाºया यंत्रसामुग्रीसाठी शासनाने इंधनाचे पैसे देण्याची तरतूद केल्यामुळे येत्या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर जिल्ह्णात गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार असून, सदरचा गाळ शेतकºयांना मोफत दिला जाणार आहे. त्यामुळे जमीन सुपीक होण्यास मदत होईल व धरणाच्या पाणी साठवणुकीत वाढ होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
मोबदला देण्यासाठी अवॉर्ड जाहीर करणार
सिन्नर-शिर्डी या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असून, चौपदरीकरणासाठी लागणारे भूसंपादनाची तयारी सुरू झाली आहे. लवकरच जागामालकांना जमिनीचा मोबदला देण्यासाठी अवॉर्ड जाहीर करण्यात येणार असून, त्यातून शेतकºयांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात प्लॅस्टिक पिशव्या बंदीसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार असून, नागरिकांना कापडी पिशव्या वापराव्यात यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

Web Title:  Direct communication with the landlords for 'prosperity'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.