Dhondwirnagar's youth suicide | धोंडवीरनगरला तरूणाची आत्महत्या
धोंडवीरनगरला तरूणाची आत्महत्या

सिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगर येथील सौरभ शरद पवार (२१) या तरूणाने गावालगत असणाऱ्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.११) रोजी उघडकीस आली. सौरभ रविवारी घरातून निघून गेल्याची चर्चा असून लष्करात भरती होण्याची तयारी करणाºया तरूणाने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गावातील संतोष दगडू सोनवणे यांच्या विहिरीच्या काठावर सौरभचा रूमाल, चप्पल व मोबाइल आढळून आल्यानंतर स्थानिकांनी विहिरीत त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. नगरपालिका रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा धोंडवीरनगर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिन्नर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दुसºया एका घटनेत सिन्नर तालुक्यातील बोरखिंड येथील पुष्पा विलास पाडेकर या महिलेच्या आत्महत्येप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संदीप बुधाजी काठे, त्याची पत्नी अर्चना काठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत पाडेकर हिच्या पतीचे २००५ साली निधन झाले आहे. संशयितांनी मयत पुष्पा हिस फोनद्वारे मानसिक त्रास देऊन पैशांची मागणी करून ब्लॅकमेल केल्याने या जाचास कंटाळून तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी रघुनाथ पाडेकर यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात वरील संशयितांविरोधात तक्रार दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे करीत आहे.


Web Title:  Dhondwirnagar's youth suicide
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.