सर्वसामान्यांच्या दारापर्यंत लोकशाही पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:54 AM2019-02-14T00:54:49+5:302019-02-14T00:55:41+5:30

मालेगाव : जातीयवादीयाकडून लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. सर्वसामान्यांच्या दारापर्यंत लोकशाही पोहोचली तरच संविधान व लोकशाहीला हात लावण्याची हिंमत कोणी करणार नाही. लोकशाहीला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर वंचित समाजाने एकत्र होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बहुजन वंचित आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस कवायत मैदानावर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

Democratize to the doorsteps of the masses | सर्वसामान्यांच्या दारापर्यंत लोकशाही पोहोचवा

मालेगावी पोलीस कवायत मैदानावर झालेल्या बहुजन वंचित आघाडीच्या मेळाव्यात बोलताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर.

Next
ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : भारिप बहुजन महासंघाचा मालेगावी मेळावा

मालेगाव : जातीयवादीयाकडून लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. सर्वसामान्यांच्या दारापर्यंत लोकशाही पोहोचली तरच संविधान व लोकशाहीला हात लावण्याची हिंमत कोणी करणार नाही. लोकशाहीला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर वंचित समाजाने एकत्र होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बहुजन वंचित आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस कवायत मैदानावर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
अ‍ॅड. आंबेडकर पुढे म्हणाले की, काँग्रेस व भाजपाने देशातील सत्ता सर्वसामान्यांच्या हातात येवू दिली नाही. म्हणून लोकशाहीवर हल्ला केला जातो. लोकशाहीला कैद करण्याचा प्रकार सुरू आहे. नोटाबंदीमुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली. कारखाने, व्यवसाय बंद पडले. शासनाला मनुवाद अनायचा आहे. त्यामुळे सावधानतेने पाऊले टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.
कापड उद्योगाला सवलतीच्या दरात वीज पुरविणे गरजेचे आहे. राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या बेलगाम घोड्याला लगाम घालण्यासाठी व संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी काँग्रेसकडे जागा वाटपाचा आराखडा मागितला होता. मात्र त्यांनी दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांचा कांदा रस्त्यावर फेकला जात आहे. शासनाने हमीभाव जाहीर केला; मात्र त्यासाठीच्या बाजारपेठा व यंत्रणेचा तपास नाही. मागचे सरकार सरळसरळ खात होते. आत्ताचे सरकार चोरांचे सरकार असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. यावेळी शांताराम बोरसे, अरुण गायकवाड, ज्ञानेश्वर ढेपले, दिशा पिंकी शेख, अनिल जाधव, अमित भाईगळ, डॉ. खालीद परवेझ, मौलाना सुफी गुलाम रसूल, प्रा. किसन चव्हाण आदिंची भाषणे झाली. मेळाव्याची वेळ दुपारी ३ वाजेची ठेवण्यात आली होती. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची तब्बल तीन तास उशिराने सभास्थळी आगमन झाले. त्यानंतरही एक तास इतर वक्त्यांची भाषणबाजी झाली. कार्यकर्त्यांना व महिलांना आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यासाठी ताटकळत बसून रहावे लागले.

Web Title: Democratize to the doorsteps of the masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.