त्र्यंबकेश्वरच्या नगरसेवकांना मतदानापासून रोखण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:20 AM2018-05-16T00:20:29+5:302018-05-16T00:20:29+5:30

नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार यादीतील गोंधळाबद्दल न्यायालयात याचिका दाखल होऊन फेरनिवडणुकीची मागणी करण्यात आलेली असून, ही याचिका सुनावणीसाठी प्रलंबित असल्याने विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून नगरसेवकांना रोखण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Demands from Trimbakeshwar corporators to stop voting | त्र्यंबकेश्वरच्या नगरसेवकांना मतदानापासून रोखण्याची मागणी

त्र्यंबकेश्वरच्या नगरसेवकांना मतदानापासून रोखण्याची मागणी

Next
ठळक मुद्देमतदानापासून रोखण्यासाठी जिल्हाधिकाºयांना साकडेगैरव्यवहार व मतदार यादीतील गोंधळाबाबत पुराव्यानिशी तक्रार

नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार यादीतील गोंधळाबद्दल न्यायालयात याचिका दाखल होऊन फेरनिवडणुकीची मागणी करण्यात आलेली असून, ही याचिका सुनावणीसाठी प्रलंबित असल्याने विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून नगरसेवकांना रोखण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सन २०१७ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीवर आक्षेप घेण्यारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून, त्यात गैरव्यवहार व मतदार यादीतील गोंधळाबाबत पुराव्यानिशी तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे विधान पषिदेच्या निवडणुकीत नगरपालिकेचे नगरसेवक मतदान करणार आहेत. परंतु न्यायालयात दाखल याचिकेनुसार गैरप्रकार करून आलेल्या नगरसेवकांचे पद रद्द झाल्यास अशा नगरसेवकांनी विधान परिषदेसाठी केलेले मतदान कायदेशीर होणार नाही त्यामुळे या निवडणुकीत ज्या प्रभागातील नगरसेवकांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, त्या नगरसेवकांना मतदानप्रक्रियेत भाग घेऊ देऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे. निवेदनावर बाळू झोले, दिलीप पवार, कैलास देशमुख, लीली लोंढे, सुनीता कोरडे, कलाबाई भांगरे, लीला गांगुर्डे, माधुरी नायकवाडी आदींच्या स्वाक्षºया आहेत.डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत या नगरसेवकांवर मदार असून, त्यांना मतदानापासून रोखण्यासाठी जिल्हाधिकाºयांना साकडे घालण्यात आल्याने चर्चा होऊ लागली आहे.

Web Title: Demands from Trimbakeshwar corporators to stop voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक