कडवा कॅनॉलला आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:10 AM2018-03-22T00:10:15+5:302018-03-22T00:10:15+5:30

निफाड व सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील अनेक गावांना दुष्काळाच्या झळा बसू लागल्या असून, परिसरातील विहिरी, कूपनलिका यांनी तळ गाठला असून, माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचा चाऱ्यापाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, परिसरातील जीवनदायिनी असलेल्या कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

The demand for release of the Crawl canal | कडवा कॅनॉलला आवर्तन सोडण्याची मागणी

कडवा कॅनॉलला आवर्तन सोडण्याची मागणी

Next

सायखेडा : निफाड व सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील अनेक गावांना दुष्काळाच्या झळा बसू लागल्या असून, परिसरातील विहिरी, कूपनलिका यांनी तळ गाठला असून, माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचा चाऱ्यापाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, परिसरातील जीवनदायिनी असलेल्या कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. निफाड तालुक्यात वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाºया भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, पिंपळगाव निपाणी, तळवाडे, महाजनपूर या गावात मार्च महिन्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, विहिरींनी तळ गाठला असून, त्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे, तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळा धरणातील पाणी दारणा नदीपात्रात सोडले जाते; मात्र दारणा नदीला मुबलक पाणी आहे, शिवाय नदीच्या पाण्यात पाणी सोडून ज्या भागात पाणी मुबलक प्रमाणात असते त्याच भागाला पाणी मिळते त्यामुळे प्रशासनाने असे न करता कॅनल परिसरातील नागरिकांना पाणी मिळावे, उन्हाळ्याच्या झळा बसू नये, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची होत असलेली भटकंती थांबवावी यासाठी कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शेतातील उभी पिके पाण्याअभावी सुकू लागले आहे. यंदा चांगला पाऊस पडला होता, त्यामुळे पाण्याने मार्च महिना तग धरला असला तरी आज मात्र झळा बसू लागल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. या परिसरासाठी जीवनदायिनी असणाºया कडवा कॅनॉलमध्ये धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने धरणात उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

Web Title: The demand for release of the Crawl canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.