कांद्यावरील निर्यातमूल्यामध्ये वाढ केंद्राचा निर्णय : दर प्रतिटन ८५० अमेरिकन डॉलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:28 PM2017-11-23T23:28:25+5:302017-11-23T23:47:54+5:30

लासलगाव : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा भाव कमी होण्याकरिता केंद्र सरकारने गुरुवारी कांद्याचे किमान निर्यातमूल्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०१५ पासून असलेले शून्य मूल्य हे दर टनाला ८५० अमेरिकन डॉलर इतके वाढविले आहे.

Decision to increase onion prices: $ 850 per tonne | कांद्यावरील निर्यातमूल्यामध्ये वाढ केंद्राचा निर्णय : दर प्रतिटन ८५० अमेरिकन डॉलर

कांद्यावरील निर्यातमूल्यामध्ये वाढ केंद्राचा निर्णय : दर प्रतिटन ८५० अमेरिकन डॉलर

Next
ठळक मुद्देकांद्यावरील निर्यातमूल्यामध्ये वाढ केंद्राचा निर्णयदर प्रतिटन ८५० अमेरिकन डॉलर

लासलगाव : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा भाव कमी होण्याकरिता केंद्र सरकारने गुरुवारी कांद्याचे किमान निर्यातमूल्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०१५ पासून असलेले शून्य मूल्य हे दर टनाला ८५० अमेरिकन डॉलर इतके वाढविले आहे.
सध्या बाजारात वाढलेले कांद्याचे दर रोखण्यासाठी हा निर्णय झाल्याचे बोलले जाते. यामुळे कांदा भाववाढीला वेसण घातली जाणार आहे. गेले तब्बल तेवीस महिने शून्य असलेले कांद्याचे निर्यातमूल्य आठशे पन्नास अमेरिकन डॉलर केले. त्यामुळे आता टनाला किमान ५५०० रुपये दराने व्यापाºयांना कांदा निर्यात करावी लागेल. या निर्णयामुळे कांदा उत्पादकांच्या नाराजीत वाढ झाली आहे. कांदा दिड वर्षात अभूतपूर्व मंदीतून सावरतो आहे.
केंद्र सरकारने डिसेंबर २०१५ पासून कांद्यावरील किमान निर्यातमूल्य दर हे शून्य केले होते. यामुळे गेल्यावर्षी कांद्याच्या निर्यातीने ऐतिहासिक विक्र म केला. मात्र किरकोळ बाजारामध्ये कांद्याने साठ रु पयांचा दर गाठल्याने सरकारमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. कांद्याचे दर स्थिर करण्यासाठी कांदा आयात,नाफेडमार्फत कांदा खरेदी, आणि आता कांद्यावरील किमान निर्यातमूल्य वाढीची मात्रा लावली आहे.
निर्यात मूल्यातील बदल२३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१३ - ८५० डॉलर (टन)
१७ जून २०१४- ३०० डॉलर (टन)
०२ जुलै २०१४- ५०० डॉलर (टन)
८ एप्रिल २०१५- २५०डॉलर (टन)
२४ आॅगस्ट २०१५- ७०० डॉलर (टन)
११ डिसेंबर २०१५ -४०० (टन)
२५ डिसेंबर २०१५ - शून्य (टन)

 

Web Title: Decision to increase onion prices: $ 850 per tonne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा