लाडची जि.प. शाळेची शेवगा रोपवाटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:43 AM2019-04-25T00:43:10+5:302019-04-25T00:44:10+5:30

कुपोषणमुक्तीसाठी लाभदायक ठरणाऱ्या शेवगा शेंगाच्या वापरासाठी नाशिक तालुक्यातील लाडची जिल्हा परिषद शाळेने शेवगा रोपवाटिका तयार केली असून, या रोपवाटिकेतून मागणी करणाºया शेतकरी आणि शाळांना शेवग्याची रोपे पुरविण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.

Dear zip The nursery of the school shovga | लाडची जि.प. शाळेची शेवगा रोपवाटिका

लाडची जि.प. शाळेची शेवगा रोपवाटिका

Next

नाशिक : कुपोषणमुक्तीसाठी लाभदायक ठरणाऱ्या शेवगा शेंगाच्या वापरासाठी नाशिक तालुक्यातील लाडची जिल्हा परिषद शाळेने शेवगा रोपवाटिका तयार केली असून, या रोपवाटिकेतून मागणी करणाºया शेतकरी आणि शाळांना शेवग्याची रोपे पुरविण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमध्ये मागील वर्षी शेवगा लागवडीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी चळवळ सुरू केली होती. यापासूनच प्रेरणा घेत नाशिक तालुक्यातील लाडची येथील प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी शेवगा रोपवाटिका तयार केली आहे.
कुपोषणाच्या निर्मूलनासाठी मागील वर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्राम विकास केंद्र सुरू केले होते. तसेच तालुका आढावा बैठकांमध्ये शेवगा लागवडीविषयी माहिती देऊन ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शेवगा लागवड करण्यासाठी आवाहन केले होते. या उपक्र माची दखल घेत अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेला शेवगा बियाणे उपलबध करून दिले होते. नाशिक तालुक्यातील लाडची शाळेतील विज्ञान शिक्षक विवेक खैरनार यांनी विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करून शेवगा रोपवाटिका तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मुख्याध्यापक विजयकुमार मोरे यांनीही या उपक्र माचे कौतुक करून त्यामध्ये सहभाग घेतला.
पंचवटी येथील पांजरापोळ येथून तसेच घरांमधील फेकण्यात येणाºया दुधाच्या रिकाम्या पिशव्या संकलित करण्यात आल्या. फेब्रुवारी महिन्यात सहावीच्या विद्यार्थ्यांनी रोपवाटिकेसाठी आच्छादन व शाळेतील भंगार साहित्य वापरून कुंपण तयार केले. नाशिक येथील महेंद्र पटेल, अंगणवाडीसेविका तसेच शेतकरी यांनी शाळेकडे रोपांची मागणी नोंदविली आहे. ग्रामपंचायतीनेदेखील यामध्ये सहभागी होऊन रोपवाटिकेसाठी पाणी उपलबध करून दिले आहे. लाडची येथील या अभिनव उपक्र माचे सर्वत्र कौतुक होत होत आहे.
शालेय वेळेनंतर रोपवाटिकेची निगा
शाळेतील शिक्षक कोंडाजी मोरे यांनी शेवगा बियाणे उपलब्ध करून दिले. शालेय वेळेनंतर रोपवाटिकेची निगा राखणे, पाणी देणे, रोपवाटिकेचे संरक्षण करणे ही कामे करण्यात आली. सुरु वातीला केवळ शेवग्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या रोपवाटिकेत सध्या शेवग्याची ७०, विलायत चिंच, करंज, चिंच आदी झाडांची ३५० रोपे वाढत आहेत. शाळेच्या या उपक्र माची दखल घेत गावकरी तसेच अंगणवाडी सेविका धनश्री पारधी, मदतनीस हौसाबाई फसाळे यादेखील शालेय वेळेनंतर रोपांचे संरक्षण करण्यासाठी योगदान देत आहेत.

Web Title: Dear zip The nursery of the school shovga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.