विंचूरीदळवी येथील विद्यार्थीनींना सायकल वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 04:17 PM2019-06-25T16:17:57+5:302019-06-25T16:18:04+5:30

सिन्नर - नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते यांच्या सुचनेनुसार चौदाव्या वित्त आयोगातून मानव विकास अंतर्गत शालेय विद्यार्थीनींना सायकलींसाठी ग्रामपंचायतीकडून अर्थसाहाय म्हणून ७५ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर १६ विद्यार्थीनींना सायकलसाठी अर्थसहाय्य करण्यात आले.

 Cycle allocation to the students of Vinchuridlawi | विंचूरीदळवी येथील विद्यार्थीनींना सायकल वाटप

विंचूरीदळवी येथील विद्यार्थीनींना सायकल वाटप

Next
ठळक मुद्दे२७ विद्यार्थीनींमधून ग्रामसभेत चिठ्ठी काढून १६ विद्यार्थीनींची निवड केली होती. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार डीबीटीद्वारे लाभार्थी मुलींनी सायकल खरेदी करून पावती सादर केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात ३ हजार ५०० रूपये ग्रामपंचायतीने रेखांकीत धनादेशाने वर

सिन्नर - नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते यांच्या सुचनेनुसार चौदाव्या वित्त आयोगातून मानव विकास अंतर्गत शालेय विद्यार्थीनींना सायकलींसाठी ग्रामपंचायतीकडून अर्थसाहाय म्हणून ७५ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर १६ विद्यार्थीनींना सायकलसाठी अर्थसहाय्य करण्यात आले.

शाळा सुरु झाल्यानंतर लगेचच या १६ विद्यार्थीनींनी या सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच संगीता पवार, उपसरपंच भास्कर चंद्रे
ग्रामपंचायत सदस्य जयराम दळवी, शांताराम दळवी, दत्ताञय शेळके, बहीरु दळवी, निर्मला दळवी, सुनिता भोर, भारती दळवी, विमल दळवी, सविता बर्वे, मुख्याध्यापक बाळासाहेब पांडे, ग्रामविकास अधिकारी संजय गिरी उपस्थित होत.

फोटो क्र.- 25२्रल्लस्रँ04
फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी ग्रामपंचायतींकडून विद्यार्थींनीसाठी सायकल खरेदीसाठी अर्थसहाय्य देऊन सायकलींचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी सरपंच संगीता पवार, भास्कर चंद्रे
जयराम दळवी, शांताराम दळवी, दत्ताञय शेळके, बहीरु दळवी, निर्मला दळवी, सुनिता भोर, भारती दळवी, विमल दळवी, बाळासाहेब पांडे, संजय गिरी आदि.

Web Title:  Cycle allocation to the students of Vinchuridlawi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.