Crusade through brothers' dispute | भाऊबंदकीच्या वादातून हाणामारी

ठळक मुद्देचौघांवर गुन्हा दाखल वडाळीत महिला गंभीर जखमी

नांदगाव : तालुक्यातील वडाळी बुद्रुक येथील पवार कुटुंबात भाऊबंदकीच्या वादातून झालेल्या मारामारीत एक महिला गंभीर जखमी झाली असून, दुसऱ्या गटातील चार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दुसºया गटाचे नागरिक नाशिकच्या कामटवाडा व भगूर येथील रहिवासी आहेत.
वडाळी बुद्रुक येथे पवार कुटुंबातील दोन गटात शेतातील वापराच्या रस्त्यावरून झालेल्या मारामारीत लाकडी काठीचा
वापर केल्याने तालुक्यातील वडाळी बुद्रुक येथील फिर्यादी अशोक माधव पवार यांच्या पत्नीच्या हाताचे हाड मोडून गंभीर जखमी झाली.
घटनेचा तपास नांदगाव पोलीस करीत आहे.काठीने अन् लाथाबुक्कयांनी मारहाण त्यांनी फिर्यादीत सांगितले की, घरासमोर बैल खुट्याला बांधत असताना संशयित संजय माधव पवार, गुलाब माधव पवार (रा. भगूर) व समाधान माधव पवार, श्रेयस संजय पवार (रा. कामठवाडा, नाशिक) यांनी वडाळी बुद्रुक येथे येऊन तुम्ही आमच्या शेतातील रस्त्याचा वापर का करतात अशी कुरापत काढून पत्नी व मुलगा यांना शिवीगाळ करून घरातून बाहेर काढून काठीने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली म्हणून गुन्हा दाखल केला.


Web Title:  Crusade through brothers' dispute
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.