अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:22 PM2017-10-01T23:22:08+5:302017-10-02T00:10:11+5:30

दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथे अतिवृष्टीने कहर माजवला असून, द्राक्षबागा व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे टमाटे, कारले, दुधी, दोडका, फ्लॉवर, कोबी आदी पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे

Crop damage due to excessive rainfall | अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

googlenewsNext

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथे अतिवृष्टीने कहर माजवला असून, द्राक्षबागा व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे टमाटे, कारले, दुधी, दोडका, फ्लॉवर, कोबी आदी पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे
जिल्हा बॅँकेनेही शेतकºयांना वाºयावर सोडल्याने शेती कशी करायची अशी भ्रांत पडली होती. शेतीसाठी पैसा आणायचा कोठून. जिल्हा बॅँकेकडेही पैसा नसल्याने गैरसोय झाली आहे. सोने गहाण ठेवून शेतीसाठी भांडवल तयार केले व त्यावर बी-बियाणे आणून पिके उभी केली. महागडी औषध फवारणी करून ही पिके कशीबशी जगवली. या परिसरात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या येणाºया संकटामुळे शेतकरी वर्ग पूर्णत: खचून गेलेला असतानाच हे नवीन संकट उभे राहिल्याने शेतकºयांची उमेद संपण्याच्या मार्गावर आहे. या सर्व नुकसान झालेल्या द्राक्षबागांचे व शेती पिकांचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, उपसरपंच बाळासाहेब चकोर, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ चौधरी, माधव चारोस्कर, चंद्रभान चौधरी, हरिभाऊ चौधरी, अण्णा तांबडे, राजेंद्र गोसावी, राजेंद्र ढाकणे आदींनी केली आहे.
तत्काळ पंचनामे करण्याची मागणी
दिंडोरी तालुक्यातील शेतकºयांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावे व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे .

Web Title: Crop damage due to excessive rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.