सदनिका जप्तीमध्ये बँकेने  वस्तू सील केल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:49 AM2018-12-20T00:49:26+5:302018-12-20T00:49:48+5:30

थकीत गृहकर्जापोटी अभ्युदय बँकेने जप्त केलेल्या सदनिकेसोबत जीवनावश्यक वस्तूही बँकेने सील केल्या असून, या वस्तू परत मिळाव्यात यासाठी बँकेकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही या वस्तू परत केल्या जात नसल्याची तक्रार सुनील मधुकर सूर्यवंशी (रा़ बी ४५, दुर्गानगर, क़ का़ वाघ महाविद्यालयामागे) यांनी पोलीस आयुक्त व आडगाव पोलीस ठाण्यात केली आहे़

 Complaint about the sealing of goods by the bank in the confiscation of the premises | सदनिका जप्तीमध्ये बँकेने  वस्तू सील केल्याची तक्रार

सदनिका जप्तीमध्ये बँकेने  वस्तू सील केल्याची तक्रार

Next

नाशिक : थकीत गृहकर्जापोटी अभ्युदय बँकेने जप्त केलेल्या सदनिकेसोबत जीवनावश्यक वस्तूही बँकेने सील केल्या असून, या वस्तू परत मिळाव्यात यासाठी बँकेकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही या वस्तू परत केल्या जात नसल्याची तक्रार सुनील मधुकर सूर्यवंशी (रा़ बी ४५, दुर्गानगर, क़ का़ वाघ महाविद्यालयामागे) यांनी पोलीस आयुक्त व आडगाव पोलीस ठाण्यात केली आहे़ बँकेने केवळ सदनिका जप्त करणे आवश्यक असताना जीवनावश्यक वस्तूही अडकवून ठेवल्याने कु टुंबाचे हाल होत असून, याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा निबंधक तसेच मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली आहे़
तक्रारदार सूर्यवंशी यांनी दिलेल्या निवेदनानुसार पंचवटीतील वाघ महाविद्यालयाजवळील जय दुर्गानगर को आॅप. हौसिंग सोसायटीत बी-४५ हे रो-हाउस खरेदी केले आहे़ यासाठी अभ्युदय बँकेच्या पेठरोड शाखेने २०१५ मध्ये सूर्यवंशी यांना १५ लाख रुपये गृहकर्ज दिले़ मात्र, सदर रो-हाउस हे डेव्हलपरने मूळ मालकास विक्री केल्यानंतर पुन्हा परस्पर दुसऱ्यास व दुसºयाने सूर्यवंशी यांना विक्री केले. ही बाब पंचवटी शाखेतील बँकेच्या अधिकाºयांना माहिती असतानाही त्यांनी गृहकर्ज देऊन फसवणूक केल्याचे निवेदनात म्हटले आहे़
अभ्युदय बँकेने सूर्यवंशी यांनी कर्जाचे हप्ते थकविल्याने रो-हाउस जीवनावश्यक वस्तूंसह सील केले़ यानंतर संबंधित घरातघरफोडी होऊन सूर्यवंशी यांचे सोन्याचे दागिने व वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या़ याबाबत बँकेने आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे़ दरम्यान, बँकेने जीवनावश्यक वस्तू व चोरी गेलेला मुद्देमाल परत करावा यासाठी ते बँक, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस ठाण्याच्या चकरा मारत असून, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे़
वस्तू देण्यास तयार
बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे गृहकर्जाच्या वसुलीसाठी हे प्रकरण आहे़ या ठिकाणी झालेल्या घरफोडीची आम्ही आडगाव पोलिसांकडे रीतसर तक्रार केली असून, जीवनावश्यक वस्तू द्यायला आम्ही तयार आहोत़ एकदा आम्ही घर उघडून दिले मात्र ते घराबाहेरच निघत नव्हते़ त्यामुळे जिल्हाधिकाºयांनीही सांगितले आहे की रीतसर आॅर्डर आणा, आम्ही वस्तू द्यायला तयार आहोत, आम्हाला केवळ प्रॉपर्टी हवी आहे़  - सूर्यकांत प्रभू, बँक अधिकारी, अभ्युदय बँक, नाशिक

Web Title:  Complaint about the sealing of goods by the bank in the confiscation of the premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.