घरपट्ट्यांबाबत ‘नरेडको’ची आयुक्तांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:17 PM2018-12-18T23:17:38+5:302018-12-19T00:33:02+5:30

सध्या शहरात महापालिकेच्या वतीने घरपट्टीसंदर्भात विशेष नोटिसा पाठविल्या जात असून, पूर्णत्वाचे दाखले असलेल्या किंवा चुकीच्या नावाने या नोटिसा पाठविल्या जात असून, नागरिक तसेच विकासक त्रस्त झाले आहेत.

 Complaint about the lodges 'NREDCO commissioner' | घरपट्ट्यांबाबत ‘नरेडको’ची आयुक्तांकडे तक्रार

घरपट्ट्यांबाबत ‘नरेडको’ची आयुक्तांकडे तक्रार

Next

नाशिक : सध्या शहरात महापालिकेच्या वतीने घरपट्टीसंदर्भात विशेष नोटिसा पाठविल्या जात असून, पूर्णत्वाचे दाखले असलेल्या किंवा चुकीच्या नावाने या नोटिसा पाठविल्या जात असून, नागरिक तसेच विकासक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात वाढीव घरपट्टी व आॅटोडीसीआर या विषयावर ‘नरेडको’ पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.  महापालिकेच्या वतीने आकारण्यात येणारी वाढीव घरपट्टीसंदर्भात नोटिसा देताना अनेक घोळ असून, चुुकीच्या नावाने आणि चुकीच्या कालावधीची घरपट्टी दिली जात आहे, अशा अनेक समस्यांकडे ‘नरेडको’च्या पदाधिकाºयांना महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी चर्चा केली. हा विषय केवळ विकासकांचा नसून सर्व नाशिककर जनतेचा असून, त्यामुळे नाशिकचा विकास खुंटला असल्याचे नरेडकोच्या पदाधिकाºयांनी सांगितले. याबाबत सुमारे दहा हजार नोटिसांबाबत खुलासा आला असून, त्या नोटिसांमध्ये चुकीच्या गोष्टी असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत लवकरच नरेडको नाशिकच्या पदाधिकाºयांबरोबर विशेष बैठक घेऊन हा विषय निकाली काढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.  याप्रसंगी नाशिक शाखेचे अध्यक्ष अभय तातेड, सुनील गवांदे, राजन दर्यानी, अमित रोहमारे, मयूर कपाटे, राजेंद्र बागड आदी पदाधिकारी उपस्थित होते.  बांधकाम परवानगीसाठी लागणाºया आॅटो डीसीआरमधील महत्त्वाच्या त्रुटी आहेत त्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या. सर्व अति महत्त्वाचे विषय असून, त्यात तातडीने लक्ष घालणार असल्याचे आयुक्त गमे यांनी सांगितले.

Web Title:  Complaint about the lodges 'NREDCO commissioner'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.