कंपनीकडून टाळाटाळ : पंधरा दिवस उलटूनही नाही दुरुस्ती पॉस यंत्राच्या नादुरुस्तीने ग्राहक धान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:59 AM2017-11-17T00:59:13+5:302017-11-17T00:59:49+5:30

तीन महिन्यांपासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रेशनमधून धान्य देताना त्यासाठी पॉस यंत्राची सक्ती पुरवठा खात्याने केली असली तरी, पहिल्या दिवसापासूनच या यंत्राविषयी रेशन दुकानदारांची असलेली तक्रार आता खरी ठरू लागली आहे.

The company has not been able to recover from the loss of the POS machine. | कंपनीकडून टाळाटाळ : पंधरा दिवस उलटूनही नाही दुरुस्ती पॉस यंत्राच्या नादुरुस्तीने ग्राहक धान्यापासून वंचित

कंपनीकडून टाळाटाळ : पंधरा दिवस उलटूनही नाही दुरुस्ती पॉस यंत्राच्या नादुरुस्तीने ग्राहक धान्यापासून वंचित

Next
ठळक मुद्देरेशन दुकानदारांचे कामकाज ठप्प यंत्रांमध्ये पहिल्या दिवसापासूनच बिघाडदुकानदारांची डोकेदुखी वाढली

नाशिक : तीन महिन्यांपासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रेशनमधून धान्य देताना त्यासाठी पॉस यंत्राची सक्ती पुरवठा खात्याने केली असली तरी, पहिल्या दिवसापासूनच या यंत्राविषयी रेशन दुकानदारांची असलेली तक्रार आता खरी ठरू लागली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पॉस यंत्राच्या साहाय्याने दिल्या जाणाºया धान्याची माहिती सॉफ्टवेअरमध्ये अपलोड होत नसताना आता मात्र यंत्रच बंद पडून पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्याने रेशन दुकानदारांचे कामकाज ठप्प झाले आहे.
रेशन दुकानातून शिधापत्रिकाधारकाला धान्य देताना पूर्वीच्या पावत्या न देता शासनाने पॉस यंत्र तयार केले आहे. या यंत्रात शिधापत्रिकाधारकाची संपूर्ण माहिती नमूद करण्यात आल्याने त्याच्या हाताच्या अंगठ्याच्या ठशाच्या साहाय्याने दर महिन्याला धान्य देण्याच्या या पद्धतीचा वापर तीन महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी शासनानेच प्रत्येक दुकानदाराला पॉस यंत्र पुरविले आहे. मात्र नाशिक शहरातील सुमारे पन्नासहून अधिक दुकानदारांचे यंत्रांमध्ये पहिल्या दिवसापासूनच बिघाड झाला होता. पॉस यंत्राच्या साहाय्याने धान्य वितरित केले जात असले तरी, त्याची माहिती पुरवठा खात्याच्या संगणकात अपलोड होत नसल्याने या दुकानदारांची डोकेदुखी वाढली होती. दुकानातून किती धान्याचे वाटप झाले याची माहिती संगणकात दिसत नसल्याने पुरवठा खात्याच्या विविध चौकश्यांना त्यांना सामोरे जावे लागले. शिवाय दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी धान्य वितरणाचा सर्व डाटा घेऊन पुरवठा खात्यात सादर करावा लागत होता. यासंदर्भात पुरवठा खात्याकडे वारंवार तक्रारी करण्यात येऊनही त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. मात्र नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पॉस यंत्राने काम करणेच बंद करून टाकल्यामुळे दुकानदारांचे कामकाज ठप्प झाले आहे. चालू महिन्याचे धान्य दुकानदारांकडे येऊन पडले असताना यंत्र बंद पडल्याने त्याचे वाटप करता येत नाही.

Web Title: The company has not been able to recover from the loss of the POS machine.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.