येवला तालुक्यातील गावांची एकत्रित दिंडी पंढरपूरला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 03:47 PM2019-06-26T15:47:24+5:302019-06-26T15:48:10+5:30

येवला : पाऊले चालती पंढरीची वाट यासाठीच येवला तालुक्यातील विविध १५ गावे एकत्र येऊन येवला ते पंढरपूर सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज पालखी व श्री यशवंत महाराज देवमामलेदार पालखीचे येवल्यात स्वागत करण्यात आले.

 The combined Dindi of the villages of Yeola taluka leaves for Pandharpur | येवला तालुक्यातील गावांची एकत्रित दिंडी पंढरपूरला रवाना

येवलातालुक्यातील १५ गावांची एकित्रत दिंडी पंढरपूरला रवाना येवल्यात स्वागत करतांना प्रभाकर झळके,मुकेश लचके,मनोहर कर्हेकर,   .

googlenewsNext


येवला : पाऊले चालती पंढरीची वाट यासाठीच येवला तालुक्यातील विविध १५ गावे एकत्र येऊन येवला ते पंढरपूर सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज पालखी व श्री यशवंत महाराज देवमामलेदार पालखीचे येवल्यात स्वागत करण्यात आले.
ज्ञानेश्वरदास महाराज, निवृत्ती महाराज(दिंडीचालक) यादवराव येवले, गुलाब गुठले (चोपदार), विठ्ठल चव्हाण(विणेकरी),यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी १०वाजता येवला तालुक्यातील१५ गावातील वारकऱ्यांच्या दिंडीचे आगमन येवला विंचूर चौफुलीवर झाले. मेनरोड, जब्रेश्वर रोड, शिंपी गल्ली मार्गाने नामदेव विठ्ठल मंदिरात पोहचली. येथे प्रभाकर झळके, यांनी दिंडीचालक निवृत्ती महाराजांना गंधलावून,पालखी पूजन केले. मुकेश लचके, अरविंद तूपसाखरे, दत्तात्रय नागडेकर, यांनी स्वागत केले
या दिंडीत सुमारे १५० वारकरी बंधू भगनी सहभागी झाले आहेत. टाळ मृदंग खांद्यावर घेऊन हरिनामाचा गजर करीत निघाली.यावेळी सेनापती तात्या टोपे शैक्षणिक संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.मुन्ना लचके,जानकीराम शिंदे, मनोहर कर्हेकर,राम तुपसाखरे, रमाकांत खंदारे, जयवंत खांबेकर, संतोष टिभे, प्रकाश खंदारे,पंकज शिंदे,वरद लचके, सोमनाथ लचके, सचिन भांबारे, व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.. 

Web Title:  The combined Dindi of the villages of Yeola taluka leaves for Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.