थंडीचा कडाका : निफाड ३, अहमदनगर ४.६ तर नागपूर ५.०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 02:21 PM2018-12-31T14:21:54+5:302018-12-31T14:25:32+5:30

राज्यात सर्वाधिक कडाक्याची थंडी सध्या नाशिकमधील निफाड तालुक्यातील रहिवाशांना अनुभवयास येत आहे. तीन दिवसांपूर्वीच निफाडमध्ये १.८ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती

Cold wave: Niphad 3, Ahmednagar 4.6 and Nagpur 5.0 | थंडीचा कडाका : निफाड ३, अहमदनगर ४.६ तर नागपूर ५.०

थंडीचा कडाका : निफाड ३, अहमदनगर ४.६ तर नागपूर ५.०

Next
ठळक मुद्देउत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरीचा परिणाम राज्यावर झाला द्राक्षमळ्यांमध्ये अक्षरक्ष: शेतक-यांनी शेकोट्या पेटविल्यानववर्ष स्वागतावर थंडीचा मोठा प्रभावउगावमध्ये पारा शून्यावर पोहचला होता

नाशिक : जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असून निफाड तालुक्यात पुन्हा राज्यातील नीचांकी ३ अंश किमान तापमान सोमवारी (दि.३१) सकाळी नोंदविले गेले. नाशिकचा पारा ७.२ अंशावर स्थिरावला तर अहमदनगरमध्ये पारा चांगलाच घसरला असून ४.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात थंडीची तीव्र लाट कायम असून नागपूरचा पारा ५ अंशापर्यंत घसरला आहे.
उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरीचा परिणाम राज्यावर झाला असून उत्तर महाराष्टÑासह विदर्भ कडाक्याच्या थंडीने गारठला आहे. राज्यातील निम्म्याहून अधिक शहरांमध्ये किमान तापमानाचा पारा दहा अंशापेक्षा खाली घसरला आहे. निफाडमध्ये रविवारी कुंदेवाडी कृषी केंद्रात २.८ अंश तापमान मोजले गेले होते तर उगावमध्ये पारा शून्यावर पोहचला होता. तसेच ओझरमध्ये थेट ०.९ आणि कसबे-सुकेणे येथे १ अंशापर्यंत तापमान खाली घसरल्याची नोंद हवामान केंद्रककडून रविवारी करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशासह उत्तरेकडील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणा-या थंड लाटेचा परिणाम नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र व विदर्भावर अधिक झाला आहे. किमान तापमानाचा पारा वेगाने घसरू लागल्याने निफाड गोठले आहे. राज्यात सर्वाधिक कडाक्याची थंडी सध्या नाशिकमधील निफाड तालुक्यातील रहिवाशांना अनुभवयास येत आहे. तीन दिवसांपूर्वीच निफाडमध्ये १.८ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती. एकूणच निफाड तालुक्यात थंडीने हाहाकार उडविला आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ थंडीने थरारला आहे. येथील द्राक्षमळ्यांमध्ये अक्षरक्ष: शेकोट्या शेतक-यांनी पेटविल्या असून, जागोजागी नागरिकदेखील उसाचे चिपाडे पेटवून शेकोटीद्वारे थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.
--
नववर्ष स्वागतावर थंडीचा मोठा प्रभाव
डिसेंबरअखेर थंडीचा जोर वाढल्याने नववर्षस्वागतावर थंडीचा प्रभाव अधिक आहे. यामुळे तरुणाईचा उत्साह काहीसा कमी झाला आहे. शहरात नववर्ष स्वागताच्या निमित्ताने विविध संस्था, सामाजिक संघटना, मित्र मंडळांसह सखींच्या ग्रूपनेही सांस्कृतिक कार्यक्रमांचे बंदीस्त सभागृहात आयोजन केले आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्ताची आखणी केली आहे. बहुतांश हॉटेलधारकांनी नववर्षानिमित्त आकर्षक आफरदेखील जाहीर केल्या आहेत.२

राज्यातील प्रमुख शहरांमधील किमान तापमान
अहमदनगर-४.६
अकोला - ५.७
अमरावती-९.६
औरंगाबाद -७
गोंदिया- ५.८
महाबळेश्वर १०.९
नाशिक - ७.२
उस्मानाबाद- ९.८
सातारा- ९.४
नागपूर- ५.०
परभणी- ७.२

Web Title: Cold wave: Niphad 3, Ahmednagar 4.6 and Nagpur 5.0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.