The city's minimum temperature of the city decreased continuously to 7.6 in the city of Nashik | शहराचा किमान तपमानाचा पारा सातत्याने घसरत नाशिक @ ७.६ शहर गारठले

ठळक मुद्देनाशिककर गारठले बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

नाशिक : शहराचा किमान तपमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे थंडीची लाट शहरासह जिल्ह्यात कायम आहे. गेल्या सहा दिवसांपासून तपमान दहा अंशांच्या खाली राहत असल्यामुळे नाशिककर गारठले आहे. शुक्रवारी (दि.२९) शहराचे किमान तपमान ७.६ इतके नोंदविले गेले. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी थंडीची तीव्रता वाढलेली दिसून आली. किमान तपमानाचा पारा खाली सरकल्याने हवेतील गारव्यात वाढ पहायला मिळाली. गेल्या सहा दिवसांपासून किमान तपमानाचा पारा सातत्याने घसरू लागला आहे. यामुळे थंडीची तीव्रता शहरात वाढली आहे. ७.६ इतके तपमान शुक्रवारी नोंदविले गेल्याने हंगामातील नीचांकी तपमानाची नोंद झाली होती. थंडीचा कडाका वाढू लागल्याने रात्री ८ वाजेनंतर शहरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला होता. एकूणच विदर्भानंतर उत्तर महाराष्टÑात नाशकात कडाक्याची थंडी जाणवत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका सर्वाधिक गारठला आहे.


Web Title: The city's minimum temperature of the city decreased continuously to 7.6 in the city of Nashik
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.