एटीएम कार्ड बदलून  ३ लाख ७० हजाराला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 01:12 AM2018-09-01T01:12:09+5:302018-09-01T01:12:30+5:30

देना बँकेचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदली करून  विविध ठिकाणच्या एटीएम केंद्रांतून तीन लाख ७० हजार रुपये काढून घेतल्याची घटना घडली

 Change the ATM card to 3 lakh 70 thousand | एटीएम कार्ड बदलून  ३ लाख ७० हजाराला गंडा

एटीएम कार्ड बदलून  ३ लाख ७० हजाराला गंडा

Next

सिन्नर : देना बँकेचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदली करून  विविध ठिकाणच्या एटीएम केंद्रांतून तीन लाख ७० हजार रुपये काढून घेतल्याची घटना घडली. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील कैलास कारभारी गफले (४०) यांनी येथील देना बॅँकेत खाते उघडून एटीएम कार्ड घेतले होते. या प्रकरणातील संशयित पांडुरंग चंद्रभान सानप (रा. भोकणी, ता. सिन्नर) याने गफले  यांच्याकडील देना बँकेचे एटीएम कार्ड घेतले व त्यांना जुने एटीएम कार्ड दिले. त्यानंतर १३ मे ते १९ आॅगस्टदरम्यान वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन लाख ७० हजार रुपये काढून घेतले.  ही घटना गफले यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्र ार दिली. संशयित सानप याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title:  Change the ATM card to 3 lakh 70 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.