चांदवड, ब्राह्मणगावला गारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:36 AM2018-04-08T00:36:34+5:302018-04-08T00:36:34+5:30

चांदवड : शहर व परिसरात तसेच ब्राह्मणगाव परिसरात दुपारी ३ वाजेच्या सुमारास अर्धा ते पाऊण तास जोरदार बेमोसमी पाऊस झाला. यावेळी गाराही पडल्या.

Chadwad, hail of Brahmanagaa rain | चांदवड, ब्राह्मणगावला गारांचा पाऊस

चांदवड, ब्राह्मणगावला गारांचा पाऊस

Next
ठळक मुद्देमेघगर्जनेसह पावसाने अर्धा ते पाऊण तास हजेरी लावलीकाही भागात जोरदार गारांचा पाऊस झाला

चांदवड : शहर व परिसरात तसेच ब्राह्मणगाव परिसरात दुपारी ३ वाजेच्या सुमारास अर्धा ते पाऊण तास जोरदार बेमोसमी पाऊस झाला. यावेळी गाराही पडल्या. त्यामुळे उघड्यावर असलेला शेतमाल, महिलांची वाळवणाची सुरू असलेली लगबगीत पावसाने एकच धावपळ उडाली. शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक पावसाचे मोठ मोठे थेंब पडू लागले. उघड्यावर असलेला शेतमाल मका, कांदा झाकण्यासाठी ताडपत्रीचा शोध सुरू झाला. प्रारंभी पाऊस संथ गतीने होता तर सव्वातीनच्या सुमारास पावसाने वेग धरला. त्यात मोठ्या गाराही पडल्या. मेघगर्जनेसह पावसाने अर्धा ते पाऊण तास हजेरी लावली. त्यात एप्रिल महिन्यात महिलांची कुरडया, पापड, मिरची, गहू वाळत घालणे आदी वाळवणाची कामे सुरू असल्याने त्यांची धावपळ उडाली, तर वाळवणांची कामे बाजूला सारून त्वरित झाकापाक करावी लागली काही भागात जोरदार गारांचा पाऊस झाला तर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले की, चांदवड परिसर सोडून इतरत्र मोठा पाऊस झाल्याची माहिती अद्याप प्राप्त नाही. या बेमोसमी पावसाने शेतपिकांचे नुकसान झाले असून, अर्धा तासात सर्वांची दाणादाण केल्याचे चित्र दिसून आले. या पावसाने उष्णता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ब्राह्मणगाव : परिसरात शनिवारी दुपारी सुमारे अर्धा तास पाऊस झाला. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने ठिकठिकाणी गारा साचल्या होत्या. या पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. येथे शनिवारी सकाळपासून दाट आभाळ होते व कडक ऊन असताना सायंकाळी मध्यम स्वरूपाच्या पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावल्याने कांदा उत्पादकांची मोठी धावपळ उडाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून उष्मा खूपच वाढला होता.
गेल्या दोन दिवसांपासून आभाळही जमू लागल्याने कांदा काढणी सर्वत्र जोरात चालू असल्याने काढलेला कांदा वातावरणामुळे साठवणुकीसाठी चाळीत भरण्याचे काम सुरू आहे, मात्र आज पावसाने सर्वांची धावपळ केली आहे. आधीच काढलेल्या कांद्याला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या कल कांदा साठवणुकीकडे आहे मात्र काढलेला बºयाच कांद्याची छाननी बाकी असल्याने चाळीत भरणे बाकी असतानाच आजच्या पावसाने शेतकºयांना प्लॅस्टिक कागद व अन्य संरक्षणात्मक उपाय करण्यास भाग पडले आहे.

Web Title: Chadwad, hail of Brahmanagaa rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस