माणकेश्वर वाचनालयाची शताब्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 06:26 PM2019-07-08T18:26:16+5:302019-07-08T18:26:25+5:30

निफाड : शतकपुर्तीनिमित्त विविध उपक्रम

Century of Makkeshwar Library | माणकेश्वर वाचनालयाची शताब्दी

माणकेश्वर वाचनालयाची शताब्दी

googlenewsNext
ठळक मुद्देग्रंथालयाने अनेक स्पर्धा परीक्षांसाठी मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयपूर्तीपर्यंत नेऊन पोहोचविले

लासलगाव : निफाड येथील माणकेश्वर वाचनालय ९ जुलै २०१९ रोजी शताब्दी साजरी करत आहे. संस्थापक चिंतामणराव गाडगीळ, विष्णुपंत सोनवणी, भाऊसाहेब उगावकर यांच्या कर्तव्यपूर्तीचे हे जागृत ग्रामदैवत एक मनोहारी वेदालय म्हणून नावारुपाला आले आहे. शताब्दीपूर्तीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ९ जुलै १९१९ रोजी निफाड तालुक्याच्या गावी ब्रिटीशांच्या पिळवणुकीला कंटाळून लोकांच्या आग्रहास्तव या सरस्वतीच्या मंदिराची स्थापना केली गेली. कोलकाताच्या राजा राममोहन रॉय प्रतिष्ठानयांच्या प्रेरणेने व बहुमोलाच्या आर्थिक सहकार्याने माणकेश्वर वाचनालयाची नूतन वास्तू न्या.महादेव गोविंद रानडे यांच्या जन्मस्थळी डौलाने उभी आहे. वाचनालयास २००५ मध्ये राजा राममोहन रॉय प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट ग्रंथालय राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. याशिवाय ग्रंथालयाचे ग्रंथपाल बाळासाहेब खालकर यांना महाराष्ट्र शासनाचा २०१४-१५ चा उत्कृष्ट ग्रंथमित्र पुरस्कार मिळाल्याने आदर्श व्यवस्थापनाचाही नावलौकिक वाढला. ग्रंथालयाने अनेक स्पर्धा परीक्षांसाठी मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयपूर्तीपर्यंत नेऊन पोहोचविले. उपविभागीय संजय बागडे, विक्र ीकर अधिकारी महेंद्र शिंदे, किनवटचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे, रेल्वे अधिकारी मिलींद गायकवाड वाचनालयाचे हे आजीव सभासद आहेत. माणकेश्वर वाचनालयाचा यशोगाथा पुढे चालू ठेवण्यात अध्यक्ष दत्ता उगावकर, मधुकर बाजीराव शेलार यांचेसह संचालकमंडळाचे मोठे योगदान राहिले आहे. दानशूर समाजसेवक व न्या. महादेव रानडे यांच्या पणतू व पणती श्री. आर.एम. विव्दांस व वसुधाताई आपटे यांनी आजीवर भरीव आर्थिक मदत वाचनालयास केली आहे. वाचनालयाच्या शताब्दीपूर्तीनिमित्त वाचनालयाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मनोहरी वेदालय
माणकेश्वर वाचनालय हे एक जाज्वल व मनोहरी वेदालय आहे, जेथे स्वरूप आहे पण ते निर्गूण आहे, अक्षरत्व आहे पण जडत्व नाही, उत्कर्ष आहे पण ईर्षा नाही, ओढ आहे पण स्वार्थ नाही. या वाचनालयाने अनेक पिढ्या घडविल्या आहेत आणि तेच संचित आहे.
- डॉ. मेघा बाळलींग जंगम, लोकसाहित्य अभ्यासक

Web Title: Century of Makkeshwar Library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक