बॉश स्पेअरपार्ट प्रकरणी नगरसेवकाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:02 AM2018-01-11T01:02:44+5:302018-01-11T01:04:06+5:30

In the case of Bosch Sparpart, the corporator's inquiry | बॉश स्पेअरपार्ट प्रकरणी नगरसेवकाची चौकशी

बॉश स्पेअरपार्ट प्रकरणी नगरसेवकाची चौकशी

Next
ठळक मुद्देबनावट स्पेअरपार्ट प्रकरण : आणखी संशयित ताब्यातप्रमुख संशयित छोटू चौधरी व त्याच्या भावास पोलीस कोठडी

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीतील स्पेअरपार्ट चोरी प्रकरणात अंबड पोलिसांनी आणखी एका संशयितास बुधवारी (दि़१०) अटक केली़ या गुन्ह्यात अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता यातील दोघांना न्यायालयीन कोठडी तर प्रमुख संशयित छोटू चौधरी व त्याच्या भावास १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी शिवसेना नगरसेवकाचे पती बाळा दराडे यांची सुमारे दोन तास चौकशी करून जबाब नोंदविले़ तर भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे व शिवसेना नगरसेवक पुत्र सचिन राणे यांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते़
बॉश कंपनीतील भंगार मालाचा ठेका घेतलेला प्रमुख संशयित छोटू चौधरी याने कंपनीतील चांगले व डिफेक्टिव्ह स्पेअरपार्ट चोरून त्यातील डिफेक्टिव्ह पार्ट रिपेअर करण्यासाठी सिडकोतील पंडितनगरमध्ये तीनमजली इमारतीत कारखानाच सुरू केला होता़ बॉश कंपनीचे हे स्पेअरपार्ट तो विविध राज्यांमध्ये विक्री करून कंपनीची फसवणूक करीत होता़ ३१ डिसेंबर २०१७ ला स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर याची चर्चा होऊन ती पोलीस व राजकीय पुढाºयांपर्यंत पोहोचली़ यानंतर अंबडच्या एका पोलीस उपनिरीक्षकासह अन्य दोन पोलीस कर्मचारी व राजकीय पुढाºयांनी हजेरी लावून यामध्ये स्वत:चे हात ओले करून घेतल्याची चर्चा आहे़
बॉश कंपनीतील हे प्रकरण उघड होऊ नये यासाठी राजकीय हस्तक्षेप होऊन आर्थिक देवाण-घेवाणीद्वारे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केले गेले़ मात्र, एकमेकांवरील राजकीय राग काढण्यासाठी आलेली ही आयतीच संधी दवडण्यासाठी कोणीही तयार नसल्याने हे प्रकरण पोलिसांत गेले़ विशेष म्हणजे ३१ डिसेंबरला प्रकरण उजेडात येऊनही पोलिसांनी तीन दिवसांनंतर गुन्हा दाखल केला व ११ कोटी रुपयांचे बॉश कंपनीचे स्पेअरपार्ट जप्त केल्याची माहिती दिली़ या प्रकरणात पोलिसांनी प्रथम दोन कामगारांना अटक केली व नातेवाइकांचीही चौकशी बॉश कंपनीतील स्पेअरपार्ट चोरी प्रकरणात संशयाच्या भोवºयात असलेल्या पोलिसांकडून नगरसेवक व नगरसेवकांच्या नातेवाइकांची चौकशी सुरू असून त्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले जात आहेत़ मुळात नगरसेवकांसह संशयित पोलिसांची वरिष्ठ पोलीस अधिकाºयाकडून चौकशी होणे गरजेचे असताना या चौकशीतून काय निष्पन्न होणार याबाबत शंकाच आहे़ दरम्यान, या प्रकरणात सातपूरमधील एका नगरसेवकाचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून, त्याचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे़

Web Title: In the case of Bosch Sparpart, the corporator's inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.