कॉ. गायकवाड यांच्याप्रती सरकारची असंवेदनशीलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 02:07 AM2018-11-14T02:07:07+5:302018-11-14T02:07:30+5:30

ऐतिहासिक तीन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग, विधानसभा, परिषदेचे सदस्य, विरोधी पक्ष नेतेपदाची कारकीर्द यशस्वी पार पाडणारे दिवंगत कॉ. माधवराव गायकवाड यांच्याप्रती राज्य सरकारची असंवेदनशीलता उघडकीस आली आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यासाठी सरकारला चोवीस तासांच्या कालावधीची वाट पहावी लागली. तोपर्यंत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

C. Insensitivity to the Government against Gaikwad | कॉ. गायकवाड यांच्याप्रती सरकारची असंवेदनशीलता

कॉ. गायकवाड यांच्याप्रती सरकारची असंवेदनशीलता

googlenewsNext
ठळक मुद्देउशिराने जाग : शासकीय इतमामाविना अंत्यसंस्कार

नाशिक : ऐतिहासिक तीन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग, विधानसभा, परिषदेचे सदस्य, विरोधी पक्ष नेतेपदाची कारकीर्द यशस्वी पार पाडणारे दिवंगत कॉ. माधवराव गायकवाड यांच्याप्रती राज्य सरकारची असंवेदनशीलता उघडकीस आली आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यासाठी सरकारला चोवीस तासांच्या कालावधीची वाट पहावी लागली. तोपर्यंत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वत्र शोककळा पसरली. गायकवाड यांचे खंडकरी शेतकरी आंदोलनातील सहभाग, स्वतंत्र भारत चळवळ, संयुक्त महाराष्टÑ आंदोलन व गोवा मुक्तीसाठी दिलेला लढ्याला उजाळा मिळाला.
प्रशासनानेदेखील प्रसंगावधान दाखवून सोमवारी सकाळी अकरा वाजताच राज्य सरकारला पत्र पाठविले व योग्य ते मार्गदर्शन व्हावे, अशी विनंती केली. दरम्यान, कॉ. गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी सकाळी दहा वाजता मनमाड येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेऊन त्या दृष्टीने तयारीही केली. परंतु त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याबाबतचा कोणताही निर्णय सोमवारी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाला प्राप्त झाला नाही. परिणामी मंगळवारी सकाळी कॉ. गायकवाड यांची मनमाड शहरात अंत्ययात्रा काढण्यात येऊन त्यांच्यावर अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू झालेली असताना दुपारी बारा वाजेनंतर राज्य सरकारचे जिल्हा प्रशासनाला पत्र प्राप्त झाले व त्यात कॉ. गायकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या. सरकारचे पत्र प्राप्त होताच, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी तत्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे, प्रांत अधिकारी भीमराज दराडे यांना कळविले. परंतु शासकीय इतमामात कॉ. गायकवाड यांना मानवंदना देण्यासाठी नाशिकहून पोलीस पथक वेळेत पोहोचणे अशक्य झाले. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी कॉ. गायकवाड यांच्या नातेवाइकांना त्याबाबतची कल्पनाही दिली. परंतु तोपर्यंत गायकवाड यांचे पार्थिव अंत्यसंस्कारस्थळी पोहोचून सर्व तयारी झाली होती. अखेर शासकीय इतमामाविनाच कॉ. गायकवाड अनंतात विलीन झाले.
विधानसभा व विधान परिषदेचे सदस्य म्हणून बजावलेली कामगिरी, विरोधी पक्ष नेते म्हणून गायकवाड यांनी केलेले कार्य पाहता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे, असे पत्र भाकपच्या सदस्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाºयांना दिले होते.

Web Title: C. Insensitivity to the Government against Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.