बीएसएनएलचे कर्मचारी, अधिकारी तीन दिवसाच्या संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 06:01 PM2019-02-18T18:01:50+5:302019-02-18T18:04:42+5:30

 बीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रम मिळावे, बीएसएनएल कर्मचाऱ्यांना तिसरा वेतन करार त्वरित लागू करावा, पेंशन रिविजन, पेंशन अंशदान मूळ वेतनावर लागू करण्यात यावी तसेच बीएसएनएलच्या उन्नतिसाठी केंद्र सरकारकडून मदत करण्यात यावी, या प्रमुख मागण्यासह प्रलंबित मागण्यासाठी ‘ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल’ तर्फे सोमवारपासून  (दि.१८) पासून तीन दिवसीय देशव्यापी संपास सुरवात करण्यात आली आहे. 

BSNL employees, officials on three-day strike | बीएसएनएलचे कर्मचारी, अधिकारी तीन दिवसाच्या संपावर

बीएसएनएलचे कर्मचारी, अधिकारी तीन दिवसाच्या संपावर

Next
ठळक मुद्देबीएसएनएल कर्मचाऱ्यांचा तीन दिवसीय संप नाशिकमध्ये द्वारसभा घेऊन संपाला सुरुवात

नाशिकबीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रम मिळावे, बीएसएनएल कर्मचाऱ्यांना तिसरा वेतन करार त्वरित लागू करावा, पेंशन रिविजन, पेंशन अंशदान मूळ वेतनावर लागू करण्यात यावी तसेच बीएसएनएलच्या उन्नतिसाठी केंद्र सरकारकडून मदत करण्यात यावी, या प्रमुख मागण्यासह प्रलंबित मागण्यासाठी ‘ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल’ तर्फे सोमवारपासून  (दि.१८) पासून तीन दिवसीय देशव्यापी संपास सुरवात करण्यात आली आहे. 
नाशिकमध्ये सोमवारी संचार भवन येथे द्वारसभा घेऊन जम्मू काश्मीर येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात येऊन शहीद झालेल्या जवानाना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच जम्मू काश्मीर येथील बीएसएनएलची सेवा सुरळित राहण्यासाठी तेथील कर्मचारी व अधिकारी यांना संपातुन वगळण्यात आले आहे. दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी बीएसएनएल कर्मचाऱ्यांना देय असलेला तिसरा वेतन करार लागू करण्याबाबत तसेच बीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रम देण्या सबंधी आश्वासन दिले होते, परंतु एक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही अजुनपर्यंत याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. बीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रम न मिळाल्याने ग्राहकाना अपेक्षित वेगवान इंटरनेट सेवा देता येत नाही. कर्मचाऱ्यांचे हक्क व ग्राहकाना वेगवान फोर-जी सेवा मिळावी यासाठी ‘बीएसएनएल’´मधील  सर्व युनियन अँड असोसिएशनद्वारे विविध मागण्यासाठी तीन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन हा संप १०० टक्के सहभाग नोंदवला आहे. याप्रसंगी ‘ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल’ चे पदाधिकारी मधुकर सांगळे, शशिकांत भदाने, राजेंद्र लहाने, दिलीप गोडसे, गौरव सोनार, गणेश बोरसे, अनिल आखाडे. अनिल पाटील, पी.एन.पाटील, अरुण उगले,  शिवाजी वारुगसे आणि श्री रामकृष्ण सोनवणे उपस्थित होते.

Web Title: BSNL employees, officials on three-day strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.