समाजसेवाव्रती बहीण-भाऊ यांचा स्नेहबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:27 AM2018-08-26T00:27:44+5:302018-08-26T00:28:20+5:30

बहीण-भावाचे नाते नाजूक बंधनाचे मानले जाते. लहानपणापासून एकमेकांशी कधी भांडून तर कधी हातात हात घालून ती वाढत-घडत असतात. आई, वडील, गुरुजन यांचे त्यात मोलाचे योगदान असतेच पण ही भावंडेही एकमेकांना घडवत असतात.

 The brother-in-law of brother-in-law | समाजसेवाव्रती बहीण-भाऊ यांचा स्नेहबंध

समाजसेवाव्रती बहीण-भाऊ यांचा स्नेहबंध

Next

नाशिक : बहीण-भावाचे नाते नाजूक बंधनाचे मानले जाते. लहानपणापासून एकमेकांशी कधी भांडून तर कधी हातात हात घालून ती वाढत-घडत असतात. आई, वडील, गुरुजन यांचे त्यात मोलाचे योगदान असतेच पण ही भावंडेही एकमेकांना घडवत असतात. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अशा नाशिकभूमीतून घडलेल्या आणि आज निरनिराळ्या क्षेत्रात आपल्या यशाची पताका फडकवणाऱ्या शहरातील बहीण-भावांच्या भावस्पर्शी कार्याचा हा आढावा...
जयंत जायभावे आणि मी वकिली क्षेत्रात येण्याचे कारण म्हणजे आमचे वडील दत्तात्रय जायभावे होय. ते आमचे प्रेरणास्थान होते. आमचे वडील काळा कोट घालून कोर्टात जायचे तेव्हा त्यांचा एक वेगळाच रुबाब असायचा. त्यांचे व्यक्तिमत्त्वही तितकेच प्रभावी होते. कोर्टात, घरी, नातेवाइकांमध्ये त्यांच्या शब्दाला मान असायचा. त्यांचा शब्द अखेरचा शब्द मानला जायचा. लोक त्यांचा खूप आदर करायचे. ते न्यायबुद्धीने काम करायचे. हे सारे पाहून आम्ही दोघा भावंडांनी वकिली क्षेत्रात जायचे लहानपणीच ठरवले होते. जयंत माझ्यापेक्षा दीड वर्षाने लहान आहे. आम्ही लॉ ला प्रवेश घेतला. आमच्या या निर्णयाचा आमच्या वडिलांना खूप आनंद झाला. यथावकाश आम्ही अभ्यासक्रम पूर्ण केला. व्यवसायास प्रारंभ केला. या व्यवसायात काम करताना कोणते आदर्श पाळले पाहिजे ते त्यांनी आम्हाला सांगितले. त्याच पायवाटेवर आजही आम्ही वाटचाल करतो आहोत.कौटुंबिक गप्पांबरोबरच व्यवसायातले अनुभव आम्ही एकमेकांना सांगतो अन् त्यावर चर्चा करतो. आज आम्ही दोघेही आमच्याकडे येणारी जास्तीत जास्त प्रकरणे समजुतीने मिटविण्याला प्राधान्य देतो. - अ‍ॅड. वसुधा कराड
मी व माझी बहीण प्राजक्ता अत्रे दोघेही गायन क्षेत्रात आज जे काही नाव मिळवू शकलो ते आई, वडील आणि गुरूंमुळेच. माझ्या आई-वडिलांना गायनाची आवड होती. आम्हा भावंडांमध्ये गाणे फुलेल, वाढेल यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. आम्ही दोघे वैरागकर सरांचे शिष्य आहोत. सरांकडे मी जास्त प्रमाणात गाणे शिकायला जायचो. घरी आल्यावर शिकलेल्या गोष्टी बहिणीला सांगायचो. दसककर सर आणि प्राजक्ता यांच्यातला मी दुवाच बनलो होतो. तिला गाण्याची उपजत देणगी होती. एखादी गोष्ट ती फार पटकन आत्मसात करते. लहानपणापासून तिचा आवाज खणखणीत होता. एकदा ती ५वीत असताना वाघ संस्थेत गाण्याची स्पर्धा होती. माईक नेमका तिच्यापासून लांब अंतरावर होता. पण त्यावेळी ती खूप खणखणीत आवाजात गायली. सर्वांना चकित करून टाकले. गाणे शिकताना समजलेल्या नवनव्या गोष्टी आम्ही एकमेकांना सांगायचो. आमची लहानपणापासून खूप छान मैत्री होती. त्या मैत्रीतूनच गाणे फुलत गेले. - आनंद अत्रे, गायक
माझी बहीण शैला दसककर आणि मी आमचे आजोबा, वडील, काका यांच्यामुळे गायन क्षेत्रात आलो. नाव, पैसा, प्रतिष्ठा मिळवू शकलो. आज माझी बहीण शैलामाई मुंबईत गाण्याचे, भजनाचे क्लास घेते. माझे आजोबा राष्टÑीय कीर्तनकार होते. काका मोठे गायक होते. वडील तर आजही गायन शिकवतात. आम्ही लहानपणी गावातल्या घरी रहायचो तेव्हा हॉर्न किंवा इतर आवाज आले की वडील आम्हाला त्यातला स्वर ओळखायला लावायचे. त्यातून आमचे स्वरज्ञान पक्के होत गेले. आम्हा बहीण भावंडांमध्ये गायनाची, रागांची स्पर्धा लागायची. वडील त्यात पुढाकार घ्यायचे. यातून आमचा पाया पक्का होत गेला. ही शिदोरी आजही उपयुक्त ठरत आहे.  - सुभाष दसककर, ज्येष्ठ गायक

Web Title:  The brother-in-law of brother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.