शासकीय आश्रमशाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 01:56 AM2019-03-02T01:56:26+5:302019-03-02T01:56:41+5:30

कळवण तालुक्यातील नरूळ येथील शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता नववीत शिकणाऱ्या नाना भगवान गांगुर्डे (१५) या विद्यार्थ्याचा आश्रमशाळा आवारातील अपूर्ण स्थितीत असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या इमारतीच्या पायथ्याशी मृतदेह आढळून आला असून, या घटनेप्रकरणी ही हत्या की आत्महत्या असे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

The body of the student in the premises of the Government Ashramshala | शासकीय आश्रमशाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा मृतदेह

शासकीय आश्रमशाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा मृतदेह

Next
ठळक मुद्देनरूळमधील घटना : हत्या की आत्महत्या याबाबत संभ्रम

कळवण : तालुक्यातील नरूळ येथील शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता नववीत शिकणाऱ्या नाना भगवान गांगुर्डे (१५) या विद्यार्थ्याचा आश्रमशाळा आवारातील अपूर्ण स्थितीत असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या इमारतीच्या पायथ्याशी मृतदेह आढळून आला असून, या घटनेप्रकरणी ही हत्या की आत्महत्या असे तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान कळवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या २२ फेब्रुवारीपासून वडाळेवणी येथील नाना गांगुर्डे हा विद्यार्थी नरूळ येथील शासकीय शाळेत व वसतिगृहात गैरहजर होता. वडाळेवणी येथून घरून आल्याचे सांगून नानाने २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजेदरम्यान चौकीदार बागुल यांच्याकडून आश्रमशाळेत प्रवेश मिळविला होता. चौकीदार बागुल यांनी अधिक चौकशी केली असता आपण वडाळेवणी येथून घरून आलो असल्याचे सांगितल्याने त्यास वसतिगृहात झोपण्यास पाठविण्यात आले. परंतु, पहाटेच्या सुमारास नानाचा मृतदेह इमारतीजवळ आढळून आला. विद्यार्थ्यांनी सदर माहिती चौकीदाराला दिल्यानंतर त्याने घटनास्थळी धाव घेऊन वसतिगृह अधीक्षक पी.
डब्ल्यू. पवार यांना घटनास्थळी बोलावले.


कारण गुलदस्त्यात
सदर घटनेचे कारण समजू शकले नाही. शवविच्छेदन तपासणी अहवालानंतर घटनेचा उलगडा होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. कळवण उपजिल्हा रु ग्णालयात शवविच्छेदन न करता नाशिक येथे शासकीय रु ग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, वडाळेवणी येथे शोकाकुल वातावरणात नाना गांगुर्डेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यंत्रणाही गोंधळात
कळवण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील यंत्रणेकडे याबाबत माहितीची विचारणा केल्यावर यंत्रणेने कानावर हात ठेवले. आश्रमशाळेतून मिळालेली माहिती व ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीत तफावत असल्याने प्रकल्प यंत्रणादेखील गोंधळात पडली आहे.
 

Web Title: The body of the student in the premises of the Government Ashramshala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.