कळवण उपनगराध्यक्षपदी भाजपच्या भाग्यश्री पगार बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 03:27 PM2018-03-26T15:27:20+5:302018-03-26T15:27:20+5:30

कळवण - नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस ,काँग्रेस, भाजप, शिवसेना विकास आघाडीच्या भाजपच्या प्रभाग क्र तीनच्या नगरसेविका भाग्यश्री गौरव पगार यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

BJP's Bhagyashree salary unceremoniously for Kalwan sub-city | कळवण उपनगराध्यक्षपदी भाजपच्या भाग्यश्री पगार बिनविरोध

कळवण उपनगराध्यक्षपदी भाजपच्या भाग्यश्री पगार बिनविरोध

googlenewsNext

कळवण - नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस ,काँग्रेस, भाजप, शिवसेना विकास आघाडीच्या भाजपच्या प्रभाग क्र तीनच्या नगरसेविका भाग्यश्री गौरव पगार यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कैलास चावडे यांनी उपनगराध्यक्षपदी सौ पगार यांची बिनविरोध निवड झाल्याचे सभागृहात घोषित करताच पगार समर्थकांनी गांधी चौक, नगरपंचायत कार्यालय व गणेशनगर भागामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. कळवण नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष साहेबराव पगार यांनी उपनगराध्यक्षपदाचा आवर्तन पध्दतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदासाठी जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांच्या आदेशान्वये आज सकाळी निर्धारित वेळेत निवडणूक घेण्यात आली. १७ नगरसेवक असलेल्या नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस ,भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्या विकास आघाडीची सत्ता असून उपनगराध्यक्षपदासाठी निर्धारित वेळेत ऐकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने उपनगराध्यक्षपदी भाजपच्या भाग्यश्री पगार यांची बिनविरोध निवडीची घोषणा तहसीलदार कैलास चावडे यांनी नगरपंचायत सभागृहात केली. यावेळी नगराध्यक्ष सुनिता पगार गटनेते कौतिक पगार, जेष्ठ नगरसेवक सुधाकर पगार, अनिता जैन , जयेश पगार, अतुल पगार, दिलीप मोरे ,मयूर बिहरम, बाळासाहेब जाधव, नगरसेविका सौ अनुराधा पगार , रंजना पगार ,रंजना जगताप ,रोहिणी महाले ,सुरेखा जगताप अनिता महाजन आदी उपस्थित होते. उपनगराध्यक्ष निवडीप्रसंगी जेष्ठ नेते डॉ पोपट पगार, नंदकुमार खैरनार , सुभाष पगार , कैलास खैरनार, जितेंद्र पगार, हरीश्चंद पगार,मोतीराम पगार सुनील महाले , गौरव पगार, गोपी पगार, डॉ सम्राट निकम, अशोक पगार ,हेमंत रावले, सुरेश पगार, बंडू पगार , संदेश पगार , धनंजय पाटील आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Web Title: BJP's Bhagyashree salary unceremoniously for Kalwan sub-city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक