भुजबळ यांची तोफ धडाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 11:57 PM2018-06-09T23:57:47+5:302018-06-09T23:57:47+5:30

नाशिक : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्टÑाच्या ‘हल्लाबोल’ यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने पुणे येथे होत असलेल्या जाहीरसभेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे पहिल्यांदाच अडीच वर्षांनंतर मार्गदर्शन करणार असल्याने या सभेच्या निमित्ताने भुजबळ समर्थकांनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या समर्थकांवर गर्दी जमा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सभेत भुजबळांची तोफ कोणावर धडाडते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Bhujbal will be gunned down | भुजबळ यांची तोफ धडाडणार

भुजबळ यांची तोफ धडाडणार

Next
ठळक मुद्देपुण्याला जाहीर सभा

नाशिक : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्टÑाच्या ‘हल्लाबोल’ यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने पुणे येथे होत असलेल्या जाहीरसभेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे पहिल्यांदाच अडीच वर्षांनंतर मार्गदर्शन करणार असल्याने या सभेच्या निमित्ताने भुजबळ समर्थकांनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या समर्थकांवर गर्दी जमा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सभेत भुजबळांची तोफ कोणावर धडाडते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महाराष्टÑ सदन घोटाळा प्रकरणी २६ महिने तुरुंगात असलेल्या भुजबळ यांना विद्यमान सरकारने सूडबुद्धीने कारवाई करून डांबल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये असून, त्याविरोधात राज्यभर अनेकवार समर्थकांनी आंदोलने करून सरकार विरोधातील रोषही प्रकट केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील कायदाच रद्द केल्यामुळे त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला
आहे.
अशा परिस्थितीत राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने पश्चिम महाराष्टÑात काढण्यात आलेल्या ‘हल्लाबोल’ यात्रा समारोपाच्या निमित्ताने पुणे येथे रविवारी दुपारी ४ वाजता शिंदे हायस्कूल मैदानावर जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले आहे. छगन भुजबळ यांच्याविषयी राज्यभर कुतूहलाचा विषय झाल्याने राष्टÑवादीने या जाहीरसभेच्या निमित्ताने भुजबळ यांना मैदानात उतरविण्याची राजकीय खेळी खेळली असून, पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणाºया या जाहीरसभेचे मुख्य आकर्षण मात्र छगन भुजबळ हेच असणार आहे. शिवाय या सभेच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेला शक्तिप्रदर्शनाची आयती संधी मिळाली असल्याने गेल्या दोन दिवसांपासून ‘चलो पुणे’ असे आवाहन भुजबळ समर्थकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जात आहे. नाशिक जिल्ह्णातील राष्टÑवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते व भुजबळ समर्थकांकडून शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी करण्यात आली असून, भुजबळ जाहीर सभेत काय बोलतात, याकडे साºयांचे लक्ष आहे.
भुजबळ यांचा जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना मुंबई बाहेर पडण्यास मज्जाव केला असला तरी, भुजबळ यांची आगामी राजकीय भूमिका काय, या विषयी राज्यभरातील राजकारण्यांमध्ये व भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: Bhujbal will be gunned down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.