भाजीमंडईत भिकाऱ्यांचा आश्रय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:41 AM2018-07-21T00:41:58+5:302018-07-21T00:42:21+5:30

महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून गंगाघाटावरील भाजीपाला विक्रेत्यांसाठी गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालयासमोर बांधलेल्या भाजीमंडईत पुन्हा एकदा भिकाºयांनी वास्तव्य केले आहे.

 Bhajimanti beggars shelter! | भाजीमंडईत भिकाऱ्यांचा आश्रय !

भाजीमंडईत भिकाऱ्यांचा आश्रय !

googlenewsNext

पंचवटी: महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून गंगाघाटावरील भाजीपाला विक्रेत्यांसाठी गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालयासमोर बांधलेल्या भाजीमंडईत पुन्हा एकदा भिकाºयांनी वास्तव्य केले आहे. एकीकडे महापालिका सदर गाळ्यांचे लिलाव करणार असल्याचे जाहीर करीत असताना दुसरीकडे याच जागेचा भिका-यांनी ताबा घेतल्याने भाजीमंडईची जागा नेमकी कोणासाठी? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी गंगाघाट परिसराला भेट देताना गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालयासमोर असलेल्या भाजीमंडईचीदेखील पाहणी केली होती. या पाहणी दरम्यान भाजीमंडईत भाजीविक्रेत्यांऐवजी चक्क भिकारी तसेच बेघर नागरिकांनी  आपले  बस्तान मांडल्याचे चित्र पालिका आयुक्तांना दिसल्याने त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाºयांना सूचना देऊन भाजीमंडई स्वच्छ करून तेथील बेघर नागरिकांना हटविण्याची मोहीम राबविली होती. त्यानंतर पालिकेने भाजीमंडईच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक तैनात केले होते.  मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरक्षारक्षक गायब झाल्याने गंगाघाट परिसरात फिरणाºया बेघर, भिकाºयांनी पुन्हा भाजीमंडईचा ताबा घेतल्याने परिसराला अवकळा आली आहे. पालिका प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष केल्याने भाजीमंडईला झोपडपट्टीचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  पालिकेने भाजीविक्रेत्यांसाठी उभारलेल्या भाजीमंडईत कोणत्याही प्रकारे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता मनपा अधिकाºयांनी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
पूरामुळे बेघरांनी आश्रय घेतला
पावसाने गोदावरी नदीला पूर आल्याने नदीकाठ परिसरात झोपड्या व राहुट्या उभारून राहणाºया नागरिकांच्या झोपड्या पाण्याखाली गेल्याने अनेकांनी जीव वाचवण्यासाठी महापालिकेच्या गणेशवाडी भाजीमंडईचा ताबा घेऊन तेथेच संसार थाटला.  पावसाची संततधार सुरू असल्याने अनेक बेघरांना दिवसा व रात्री पावसापासून बचाव करण्यासाठी लपंडावाचा खेळ खेळावा लागत आहे. गंगाघाट परिसरात वास्तव्य करणाºया अनेक बेघरांनी भाजीमंडईचा ताबा घेत तेथेच चूल मांडल्याने सध्या भाजीमंडई बेघरांचे आश्रयस्थान बनली आहे.
गोदावरी नदीला पूर येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर नदीकाठच्या परिसरात झोपड्या व पाल उभारून राहणाºया बेघर नागरिकांनी आपल्या कपड्यांची गाठोडी करून लहान मुलांना खांद्यावर घेत महापालिकेच्या भाजीमंडईचा रस्ता धरला.  मनपाने भाजीमंडईत भाजीविक्रेत्यांसाठी तयार केलेल्या ओट्यांवर सध्या बेघरांनी सहारा घेतला असून, भाजीमंडईलाच त्यांनी आपले निवासस्थान समजून तेथे चूल पेटवून दाटीवाटीने संसार थाटलेले आहेत. भाजीमंडई सध्या भाजीविक्रेत्यांविना ओस पडून असल्याने गंगाघाट परिसरातील बेघर नागरिकांनी पावसाच्या निमित्ताने का होईना पुन्हा एकदा भाजीमंडईचा ताबा घेतल्याचे चित्र होते.

Web Title:  Bhajimanti beggars shelter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.