शिवसेनेच्या वतीनेमहाआरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 04:00 PM2018-11-25T16:00:33+5:302018-11-25T16:00:43+5:30

  इगतपुरी : आयोध्येत राम मंदिर उभारावे या मागणीसाठी इगतपुरी येथील शिवसेनेच्या वतीने काल सायंकाळी तीन लकडी येथील बालाजी मंदिरात महाआरती करण्यात आली.

 On behalf of Shivsena Maha Ratnam | शिवसेनेच्या वतीनेमहाआरती

शिवसेनेच्या वतीनेमहाआरती

Next
ठळक मुद्देशिवसेनेच्या वतीने महीलांनी मंदिरात विविध धार्मिक रामाची भजने आरती करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भगवे शर्ट, टोप्या तर महिलांनी भगव्या साड्या परिधान केल्यामुळे सर्व परिसर भगवामय झाला होता. यावेळी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांच्या हस्ते बालाज

 
येवला : दत्ता महाले
लोककला जोपासण्यासाठी राजाश्रय मिळत नसल्याने गेल्या दहा ते बारा वर्षात महाराष्ट्रातील तमाशाच्या फडांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा अनुभव भिका-भिमा( सांगवीकर)या तमाशा मंडळाच्या कलाकारांनी लोकमतकडे व्यक्त केला.पिंपळगावलेप येथील यात्रेत आलेल्या भिका-भिमा( सांगवीकर)या तमाशा मंडळाच्या कलाकारांनी आपला फड गाजवला पण जाता जाता हे कलाकार आपली व्यथा सांगून गेले.या कलाकारांना पोट भरण्यासाठी गावोगावी भटकंती करावी लागते.आण िआता तमाशा या लोककलेकडे पाहण्याची दृष्टी देखील बदलत चालली असल्याचे या कलाकारांचे म्हणणे आहे.
सर्वसामान्य माणसांना टिव्ही मोबाईल इंटरनेटच्या जमान्यात झपाटून टाकले आहे.पूर्वी तमाशातील कलाकारांना मान सन्मान मिळायचा परंतु आताचे सोळा ते पंचवीस वयोगटातील तरूण तमाशात वाद घालतात,खोडी काढतात. कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देणे तर दूरच,आपली कला सादर करणार्या मुलींकडे खडे फेकतात.या लोककलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्याने
महाराष्ट्रातील अनेक तमाशा मंडळांचे रंगणारे फड आता बंद झाली आहे. सध्या रघुविर खेडकर,मंगला बनसोडे,भिका-भिमा(सांगवीकर), साहेबराव नांदवळकर,मालती इनामदार( नारायणगांवकर)भिका-नामा,अंजलीताई नाशिककर,तुकाराम खेडकर आदी तमाशा मंडळांचीच लोकनाट्य सध्या कार्यरत आहे.परंतु महाराष्ट्र शासनाकडून मानधन मिळत नसल्याने तमाशा कलावंताना फार वाईट दिवस आले आहे.बाजारात किंवा यात्रेत तिकीट विक्र ी करून सुध्दा दोन- तीनशे लोक देखील तमाशा पाहण्यासाठी येत नाहीत.या कलेकडे आता कानाडोळा होवू लागला आहे.केवळ वीस ते पंचवीस टक्के लोक येतात.परंतु तेही हिन्दी मराठी गाण्याची रंगबाजी पाहण्याची फर्माईश करतात.वगनाट्य बघण्यासाठी कोणीही सरसावत नाही.परंतु आम्ही आमच्या पूर्वजांनी करून ठेवलेल्या कलागुणांचा वारसा टिकून ठेवण्यासाठी गावोगावी आम्ही भटकत असल्याचे भिका-भिमा( सांगवीकर)तमाशा मंडळाच्या मालकांनी सांगितले.
====
तमाशा ही महाराष्ट्राची अतिशय लोकिप्रय लोककला असून महाराष्ट्रातील लोककलांची ओळखच तमाशाद्वारे झालेली आहे.तमाशा ही जरी निखळ रंजनपर लोककला असली, तरी तमाशाचे मूळ हे कलगी-तुर्याच्या आध्यात्मिक शाहिरीमध्ये दिसते.संत एकनाथांच्या बाजेगारी भारु डात तमाशा शब्द आहे. तमाशा हा शब्द फारसीतून उर्दूत आला आण िउर्दूतून मराठीमध्ये स्थिरावला आहे.

=====
पुर्वीच्या कलावंतामध्ये आताच्या कलावंतामध्ये बराच बदल झाला आहे.आताच्या नवीन पदवी घेतलेल्या चांगल्या घराण्यातील मुली तमाशात नाचण्यासाठी येतात. परंतु तमाशाकडे बघण्याचा दृष्टीकोन रिसकांचा बदलला आहे.मात्र तमाशा कलाकारांना कोणी शाबासकीची थाप देत नसल्याची खंत आहे.
तमाशा मालक
योगेश( भिका-भिमा) सांगवीकर.
==
पिंपळगांव लेप :येथील यात्रेत आलेले लोक मनोरंजनसाठी भिका-भिमा लोकनाट्य तमाशा मंडळांचे फड.(25तमाशा)

Web Title:  On behalf of Shivsena Maha Ratnam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.