वातावरणाच्या बदलाने खरीपपूर्व मशागतीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 06:53 PM2019-06-10T18:53:17+5:302019-06-10T18:53:38+5:30

नायगाव : यंदा पावासाळा कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्याच प्रमाणे पाऊस जवळ आल्याचे संकेत सध्या शेतकऱ्यांना पारंपरिक नैसर्गिक हालचालीवरून मिळत आहे. झाडाच्या फांद्यावरून येणारा पावशाचा मंजूळ आवाज बळीराजाला पावसाचा सांगावा घेऊन आल्याने खरिपपूर्व मशागतीना सध्या शेत शिवारात सुरवात झाली आहे.

 The beginning of the kharif pre-mishagti in changing the atmosphere | वातावरणाच्या बदलाने खरीपपूर्व मशागतीस प्रारंभ

वातावरणाच्या बदलाने खरीपपूर्व मशागतीस प्रारंभ

Next

लग्न समारंभाची धामधुम संपून उन्हाचीही तीव्रता काही अंशी कमी होऊन हवेचे प्रमाण वाढले आहे. नायगाव खो-यात खरिपपुर्व मशागतीच्या कामांची सध्या लगबग सुरू आहे. जून महिना सुरू झाला आहे. उशीरा का होईना वरूनराजाचे आगमन थोड्याच दिवसात होणार असल्याचे भाकीत वेध शाळेबरोबर वातावरणातील बदलावरून दिसत आहे. शेतकऱ्यांना सध्या खरिपाचे वेध लागले आहेत. मशागतीचे कामे सुरु झाल्याचे चित्र सध्या शेत शिवारात नजरेस पडत आहे. सध्या लागवडीसाठी तयार झालेल्या जमिनीवर रोपटीका बनविण्यासाठी मेहनत सुरू आहे. यंदा पावसाळा उशीरा व कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवल्याने यावर्षी शेतकरी कमी पाण्यावर व कमी खर्चात येणा-या पीकांची लागवड करण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या जोरदार वा-याने शेतक-यांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. जोराच्या हवेने पाऊस लवकर येईल किंवा लांबणीवर जाईल अशा दोन्ही भाकीते शेतकरी करत आहे. त्यामुळे नक्की काय पदरात पडणार याबाबत शेतक-यांत संभ्रम आहे. गतवर्षी पडलेल्या अत्यल्प व शेवटच्या टप्प्यात झालेल्या कमी पावसामुळे यावर्षी प्रथमच नायगाव खोºयात तीव्र पाणीटंचाई भासली. परिसरातील विहिरी यावर्षी पहिल्यांदाच कोरड्या पडल्या आहेत. जून महिन्याच्या मध्यावर पाऊस होणार असल्यामुळे खरिप पिकांच्या पेरणीसाठीचे बाजरी, सोयाबीन, भुईमुग, मुग-मठ, उडीद आदींसह विविध बियाणे खरेदीसाठी तर टमाटे, कोबी, फ्लावर, मिरची, वांगे आदी पिकांच्या रोपांची लागवडीसाठी नर्सरीत किंवा आपल्याच शेतात तयार करण्यासाठी शेतक-यांची धावपळ सुरू झाली आहे.

Web Title:  The beginning of the kharif pre-mishagti in changing the atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी