सोमेश्वर मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी बाळासाहेब लांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:26 AM2018-10-21T00:26:21+5:302018-10-21T00:26:58+5:30

सोमेश्वर महादेव देवस्थानच्या अध्यक्षपदावर बाळासाहेब लांबे, तर उपाध्यक्षपदी भीमराव पाटील यांची निवड करण्यात आली. सोमेश्वर मंदिराच्या पुरातन पिंडीला धक्का पोहोचविल्याच्या कारणावरून देवस्थानचे अध्यक्ष प्रमोद गोरे हे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.

Balasaheb Lambe as President of Someshwar Temple Trust | सोमेश्वर मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी बाळासाहेब लांबे

सोमेश्वर महादेव देवस्थानचा कार्यभार अध्यक्ष बाळासाहेब लांबे यांच्याकडे देताना प्रमोद गोरे, विश्वस्थ सतीश मुजूमदार, हरिशचंद्र मोगल, श्यामसिंग परदेशी, राहुल बर्वे, देवेंद्र भुतडा, अरुण पाटील, दत्तू डंबाळे, बाळासाहेब पाटील, गणेश निमसे, गजाभाऊ गायकवाड, अरुण भीमराव पाटील आदी.

googlenewsNext

गंगापूर : सोमेश्वर महादेव देवस्थानच्या अध्यक्षपदावर बाळासाहेब लांबे, तर उपाध्यक्षपदी भीमराव पाटील यांची निवड करण्यात आली.
सोमेश्वर मंदिराच्या पुरातन पिंडीला धक्का पोहोचविल्याच्या कारणावरून देवस्थानचे अध्यक्ष प्रमोद गोरे हे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक घेण्यात आली. यावेळी निवडणुकीसाठी सर्व ११ विश्वस्त उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी बाळासाहेब लांबे व अविनाश पाटील यांच्यात चिठ्ठी पद्धतीने लढत होऊन बाळासाहेब लांबे यांना ८ मते तर अविनाश पाटील यांना ३ मते पडली.
तसेच यावेळी उपाध्यक्ष भीमराव पाटील, सचिव अ‍ॅड. बापूसाहेब गायकर, खजिनदार गोकुळ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी विश्वस्थ सतीश मुजुमदार, हरिशचंद्र मोगल, श्यामसिंग परदेशी, राहुल बर्वे, देवेंद्र भुतडा, अरुण पाटील, दत्तू डंबाळे, बाळासाहेब पाटील, गणेश निमसे, गजाभाऊ गायकवाड, अरुण भीमराव पाटील आदींनी नवनिर्वाचित पदाधिकाºयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Web Title: Balasaheb Lambe as President of Someshwar Temple Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.