शिवतेज मंडळातर्फे पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:49 AM2018-10-23T00:49:55+5:302018-10-23T00:50:12+5:30

डीजीपी क्र मांक दोन येथील शिवतेज कला-क्रीडा मित्रमंडळाच्या आयोजित बक्षीस वितरण कार्यक्र मात उत्कृष्ट दांडिया व उत्कृष्ट वेशभूषा सादर करणाऱ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पैठणी साडी, फ्रीज, सायकल व एलइडी टीव्हीसह सुमारे २०० पारितोषिके प्रदान करण्यात आली.

 Award distribution through Shitaj Mandal | शिवतेज मंडळातर्फे पारितोषिक वितरण

शिवतेज मंडळातर्फे पारितोषिक वितरण

Next

सिडको : डीजीपी क्र मांक दोन येथील शिवतेज कला-क्रीडा मित्रमंडळाच्या आयोजित बक्षीस वितरण कार्यक्र मात उत्कृष्ट दांडिया व उत्कृष्ट वेशभूषा सादर करणाऱ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पैठणी साडी, फ्रीज, सायकल व एलइडी टीव्हीसह सुमारे २०० पारितोषिके प्रदान करण्यात आली.
डीजीपीनगर येथील शिवतेज कला-क्रीडा मंडळाच्या वतीने बक्षीस देऊन गौरविण्यात येते. यंदाच्या वर्षी उत्कृष्ट दांडिया खेळणाºयांना खासदार हेमंत गोडसे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, आयोजक नगरसेवक दिलीप दातीर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, मनपा शिवसेना गटनेते विलास शिंदे, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, पश्चिम विधानसभाप्रमुख सुभाष गायधनी, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, महिला आघाडी जिल्हा संघटक श्रीमती मंदा दातीर, नाना पाटील, संदीप जाधव, सिद्धेश्वर साळुंखे याच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांचे स्वागत आयोजक नगरसेवक दिलीप दातीर व अरु णा दातीर यांनी केले.  कार्यक्र माप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष शरद गायधनी, उपाध्यक्ष बाळासाहेब कोरडे, सचिव विशाल मटाले, खजिनदार संजय मटाले आदी सहभागी झाले होते.

Web Title:  Award distribution through Shitaj Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक