अवंतीपोरा दहशतवादी हल्ला : पाकिस्तानच्या निषेधार्थ जाळला इमरान खानचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:23 PM2019-02-14T23:23:56+5:302019-02-14T23:24:45+5:30

जुने नाशिकमधील गाडगे महाराज धर्मशाळेजवळ संभाजी ब्रिगेड चे शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ यांच्या नेतृवाखाली ‘पाकिस्तानच्या निषेध आंदोलनाला सुरु वात झाली.

Avantipora terrorist attack: Imran Khan's statue burnt by Pakistan's protest | अवंतीपोरा दहशतवादी हल्ला : पाकिस्तानच्या निषेधार्थ जाळला इमरान खानचा पुतळा

अवंतीपोरा दहशतवादी हल्ला : पाकिस्तानच्या निषेधार्थ जाळला इमरान खानचा पुतळा

Next
ठळक मुद्देपाकिस्तानला वेळीच धडा शिकविणे गरजेचे

नाशिक : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात सुमारे ४०जवान शहीद झाल्याची दुदैवी व तीतकीच संतापजनक घटना घडली. या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.
जुने नाशिकमधील गाडगे महाराज धर्मशाळेजवळ संभाजी ब्रिगेड चे शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ यांच्या नेतृवाखाली ‘पाकिस्तानच्या निषेध आंदोलनाला सुरु वात झाली. ‘भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, काश्मीर मांगेंगे तो चिर देंगे, इम्रान खान मुर्दाबाद’ असा जयघोष करत युवकांनी इम्रानखानची पोस्टर व प्रतिकात्मक पुतळा जाळला.
दरम्यान एकीकडे पाकिस्तान आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना आतंकवाद्यांना छुपी मदत करून शहीद करत असताना भारताचे नेते मात्र ‘समजोता’ करण्याचा प्रयत्न करत आहेत ही घटना निषेधार्त असून पाकिस्तानला वेळीच धडा शिकविणे गरजेचे असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांमधून उमटल्या. यावेळी हर्षल पवार, नितीन डांगे पाटील, अजय कोर,विकास ढोले, मयुर पठाडे, राकेश सहाणे,शशिकांत कटारे, सनी ठाकरे, युवराज पवार आदि उपस्थित होते.

Web Title: Avantipora terrorist attack: Imran Khan's statue burnt by Pakistan's protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.