जमिनीचा लिलाव शेतकरी संघटनेने रोखला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 05:58 PM2019-06-04T17:58:49+5:302019-06-04T17:59:01+5:30

  येवला : शेतकऱ्यांनी घेतलेले पिक कर्ज, पाईपलाईन कर्ज असो कि सिंचनासाठी घेतलेल कर्ज या कर्जाची रक्कम पूर्णपणे शेतातील पिकासाठीच खर्च केली परंतु त्याला शेतीमालाला रास्त भाव न मिळाल्याने कर्ज थकले अशी सविस्तर मांडणी कोटमगावच्या तरूण शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी करून अधिका-यांना धारेवर धरीत नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली पथकाने मंगळवारी चार जूनला कोटमगाव विठ्ठलाचे या गावात सुरु केलेली कर्जवसुलीची प्रक्रि या शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आणिप्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकाºयांनी रोखली.

 Auctioned farmer organization has prevented! | जमिनीचा लिलाव शेतकरी संघटनेने रोखला!

जमिनीचा लिलाव शेतकरी संघटनेने रोखला!

Next
ठळक मुद्देया पुढे कोणत्याही गावात शेतकºयांच्या जमिनींचा लिलाव होऊ देणार नाही आणि गावात प्रवेश करू देणार नसल्याचा ईशारा देण्यात आला. शेतकº्यांच्या जमिनीचे लिलाव करून शेतकºयांना देशोधडीला लावणार का? मोठ्या उद्योजक कर्जदाराचे लिलाव का करत नाही? असे अनेक प्रश्न विचारत

 
येवला :
शेतकऱ्यांनी घेतलेले पिक कर्ज, पाईपलाईन कर्ज असो कि सिंचनासाठी घेतलेल कर्ज या कर्जाची रक्कम पूर्णपणे शेतातील पिकासाठीच खर्च केली परंतु त्याला शेतीमालाला रास्त भाव न मिळाल्याने कर्ज थकले अशी सविस्तर मांडणी कोटमगावच्या तरूण शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी करून अधिका-यांना धारेवर धरीत नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली पथकाने मंगळवारी चार जूनला कोटमगाव विठ्ठलाचे या गावात सुरु केलेली कर्जवसुलीची प्रक्रि या शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आणिप्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकाºयांनी रोखली.यापुढे वसुलीची प्रक्रि या थांबली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अधिकाºयांना शेतकरी संघटनेच्यापदाधिकाºयांनी दिला असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती सर्वस्वी जबाबदारी नासिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची राहील असे म्हटले आहे.
नासिक जिल्हा बँकेने कर्जदार शेतकºयांच्या जमिनीचे लिलाव करण्याची कारवाई चालु केली आहे. शुक्र वार ३१ मे रोजी जळगावनेऊर या गावात शेतकरी संघटनेने आंदोलन करून लिलाव रोखल्या नंतर येवला तालुक्यात जिल्हा बँकेच्या वसुली पथकाने मंगळवारी चार जूनला कोटमगाव विठ्ठलाचे या गावात येवून पुन्हा वसुली मोहीम सुरु केली होती.यावेळी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आण िशेतकरी मोठयÞा प्रमाणात जमा झाले. त्यांनी अधिकाº्यांना जळगाव नेऊर येथील घटनेची आठवण करून देत, लिलाव प्रकिया थांबविण्याचे निवेदन देऊनही तुम्ही का आले? असा जाब विचारला. महाराष्ट्र शासनाने कर्ज वसुलीस स्थगिती दिली असतांना तुम्ही लिलाव कसे करता? शासनाच्या धोरणामुळे शेतकरीअर्थिक कोंडीत सापडला आहे.शेतीमालाला भाव मिळत नाही,निर्यात बंदी, सिमा बंदी मुळे तंबाटे, कांदा, फळ पिकाला मातीमोल भाव मिळाला तर दुष्काळी परिस्थितीने तर कधी गारिपटीने वेळोवेळी पिकाचे नुकसान झाले. यंदा तर भयानक दुष्काळी परिस्थिती आहे.
आम्ही काही करत नाही परंतु सर्वजण बसून राहु असे वसुली अधिकाºयाचे म्हणणे गावकºयांनी न जुमानता अधिका-यांना सोडून सोसायटी कार्यालयातून बाहेर जाण्यास भाग पाडले.या पुढेही शेतकरी एकजुटीने नासिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची कारवाई होऊ देणार नसल्याचे दोन्ही शेतकरी संघटनेने जाहिर केले.
या प्रसंगी कर्जदार शेतकरी,सोसायटीचे चेअरमन,गावच्या सरपंच,संचालक, शेतकरी संघटनेचे नेते संतु पाटील झांबरे, महिला आघाडीच्या निर्मला जगझाप,अरूण जाधव,बापूसाहेब पगारे, सुभाष सोनवणे, जाफरपठाण, शिवाजी वाघ, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल वाळके, हरिभाऊ महाजन,वसंत झांबरे, सागर गायकवाड कोटमगावचे ग्रामस्थ सुभाष कोटमे, राजेंद्र कोटमे. हनुमंत कोटमे, दिलीप कोटमे. देवगावचे विलास शिंदे, प्रशांत कुलकर्णी, लहानु मेमाणे, विश्वनाथ निलख, वाकदचे, रामनाथ बडवर,सुरेश शेळके, जयाजी शिंदे, गोविंद कोटमे, नानाभाऊ कोटमे,सोनाली कोटमे, ज्ञानेश्वर जगझाप, साहेबराव जगझाप, गोरख जगझाप, सचिन ढमाले, नंदू जाधव,पंढरीनाथ वरे, नारायण जानराव,सह शेतकरी आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=================================================
फोटो कॅप्शन
कोटमगाव विठ्ठलाविठ्ठलाचे येथील शेतकºयाच्या जमिनीचा लिलाव रोखण्यासाठी झालेल्या आंदोलन प्रसंगी शेतकर्यांना संबोधित करताना शेतकरी संघटनेचे व प्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आण िजमलेले शेतकरी.(04येवला शेतकरी लिलाव)

Web Title:  Auctioned farmer organization has prevented!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.