वार्षिक सभा खेळीमेळीत

By admin | Published: September 28, 2014 11:19 PM2014-09-28T23:19:12+5:302014-09-28T23:19:45+5:30

निसाका सुरु करण्याची मागणी

Annual Meeting Cohesion | वार्षिक सभा खेळीमेळीत

वार्षिक सभा खेळीमेळीत

Next

भाऊसाहेबनगर : निफाड सहकारी साखर कारखान्याची ५३ वी वार्षिक सर्व साधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी विषय पत्रिकेतील सर्व विषयांना मुंजरी देतानाच कारखाना कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर सुरु करून यावर्षीचा गाळप हंगाम यशस्वी करावा, अशी मागणी केली.
गत वर्षीचा गाळप बंद असल्याचे परिणाम सभासदांसह कामगारांनी भोगले असून गेल्या अनेक दिवासांपासून कारखाना चालविण्यासाठी अनेक संस्थांशी संचालक मंडळ चर्चा करीत होते. परंतु त्यात यश येत नव्हते. बॉम्बे एक मोटर्स प्रा. ील. या कंपनीशी कारखाना सहभागी तत्त्वावर चालविण्यास देण्यासंबंधीचा करार अंतीम टप्यात असून परवानगी मिळताच शासकीय देणी व जिल्हा बँकेचे कर्ज भरुन करार करण्यात येईल असे बोरस्ते यांनी सांगितले.
सतपालसिंग ओबेरॉय यांनी सरकारी परवानग्या पुर्ण झाल्या असून मंत्रालयात अंतीम परवानगसाठी नंतर सर्वाच्या सहयोगाने कारखाना तिन वर्षात पुर्वपदावर आणु अशी ग्वाही दिली. चर्चेत माणिक बोरस्ते, विनायक शिंदे, नारायण शिंदे, आदींनी सहभाग घेतला.
सभेस आमदार अनिल कदम माजी आमदार दिलीप बनकर राजेंद्र मोगल, दिगंबर गिते, सुरेश दाते, सुभाष होळकर, सुभाष कराड, दत्तु डुकरे, रामनाथ केदार, कचरु राजोळे, शिवनाथ कडभाने, दिलीप मोरे, विलास मत्सागर, भास्कर पानगव्हाणे, शिवाजी ढेपले, अ‍ॅड. निकम पंडीतराव सांगळे, माणिक वनारसे, रोहीदास कदम, सौ. लिलावती तासकर, सिंधुताई खरात, तानाजी पुरकर, बबनराव सानप आदींसह प्रभारी कार्यकारी संचालक भागवत भंडारे मुख्य लेखापाल बाळासाहेब गावले अनिल पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Annual Meeting Cohesion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.