संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:26 AM2019-03-12T01:26:37+5:302019-03-12T01:27:01+5:30

येथील प्रभाग क्र मांक २८ मधील विविध भागांत मागील गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, दोन दिवसांपासून तर पिण्यापुरतेही पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी (दि. ११) सकाळी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

The angry citizens stopped the water supply officials | संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना डांबले

संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना डांबले

Next

सिडको : येथील प्रभाग क्र मांक २८ मधील विविध भागांत मागील गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, दोन दिवसांपासून तर पिण्यापुरतेही पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी (दि. ११) सकाळी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. याबाबत विभागीय अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून विचारणा केली असते त्यांनी उडवाउडवीचा उत्तर देत दखल न घेतल्याने सुवर्णा मटाले यांनी थेट विभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात असलेल्या पाणीपुरवठा अधिकाºयाना डांबून ठेवून कार्यालयाला टाळे ठोकले.
सिडकोतील प्रभाग क्र मांक २८ मधील जाधव संकुल, मयुर हॉस्पिटल परिसर, सिद्धटेकनगर, विशालपार्क, विखे-पाटीलनगर, वृंदावननगर, डीजीपीनगर या भागातील पाणीपुरवठा गेल्या सहा महिन्यांपासून विस्कळीत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने प्रभागातील महिलांनी अखेरीस सोमवारी (दि.११) प्रभागातील महिलांनी थेट नगरेसवक सुवर्णा मटाले यांच्या निवसस्थानी जाऊन पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी केली.
विभागीय अधिकाºयांनी आचारसंहिता असल्याने मोर्चाची परवानगी आहे का? असा प्रश्न विचारून याठिकाणी पोलीस बंदोबस्त मागविला. अधिकाºयांनी पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी पोलीस बंदोबस्त मागविल्याने महिला नगरसेवक सुवर्णा मटाले यांनी थेट विभागीय अधिकाºयांच्या दालनात असलेल्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दौलत घुले, शाखा अभियंता गोकूळ पगारे, कनिष्ठ अभियंता ललित भावसार या तीन अधिकाºयांना डांबून दालनाला टाळे ठोकले.

Web Title: The angry citizens stopped the water supply officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.